अमरावती : रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ५४ व्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अमरावती येथील हौशी जिम्नॅस्टिक संघ गुरुवारी रवाना झाला. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती जिल्हा हौशी जिम्नॅस्टिक्स संघटना प्रशिक्षण केंद्रामध्ये नियमित सरावाकरिता येणारे खेळाडू १३ ते १५ डिसेंबर दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यातील डेरवण येथे होणाऱ्या जिम्नॅस्टिक स्पर्धेत सहभागी होणार आहे. यामध्ये १० वर्षे वयोगटातील रोहिताश जोशी, आयुष चौधरी, देवेश गुप्ता व मुलींमधून यशिका नागापुरे, मुग्धा तांबट मिनी १२ वर्षांआतील मुलांच्या गटात मंथन सोनकुसरे, देव गुप्ता, आदित्य चौंधे, सारंग भांडारकर तसेच सब ज्युनिअर १२ वर्षांआतील मुलींच्या संघात क्रिष्णा भट्टड, कृती चुडासमा, अनुष्का धस, सबज्युनिअर १४ वर्षे वयोगटात प्रथमेश लोखंडे, देव कुरील, रोहन तळणकर यांचा समावेश आहे. संघासोबत संघ व्यवस्थापक म्हणून आशिष हटेकर, सचिन कोठारे, वैशाली लोहकरे राहतील.
राज्य अजिंक्यपद जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी अमरावतीचा संघ रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 18:03 IST