शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अमित समर्थ यांची सायकलवरून सुरु झाली भारत भ्रमंती, ग्रामीण खेळाडूंसाठी उभारणार निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 06:35 IST

Amit Samarth's tour of India started on a bicycle : विशेष म्हणजे, या मोहिमेद्वारे हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पासाठी निधी उभारण्याचे लक्ष्य समर्थ यांनी बाळगले आहे.

मुंबई : विविध लांबपल्ल्याच्या सायकल मोहीम गाजवून वेगळी ओळख निर्माण केलेले अनुभवी अल्ट्रा सायकलिस्ट डॉ. अमित समर्थ यांनी शनिवारी मुंबईतून भारत भ्रमंतीला सुरुवात केली. आगामी १४ दिवसांमध्ये सायकलद्वारे तब्बल सहा हजार किमी अंतर पूर्ण करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेद्वारे हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पासाठी निधी उभारण्याचे लक्ष्य समर्थ यांनी बाळगले आहे.‘राइड अ‍ॅॅक्रॉस इंडिया’ या मोहिमेंतर्गत ६ हजार किमी सायकल प्रवास करण्याचा संकल्प समर्थ यांनी केला आहे. १५ फेब्रुवारीला गेट वे ऑफ इंडिया येथून या मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेद्वारे समर्थ सुमारे ८५ शहरांना भेट देतील. या संपूर्ण मोहिमेचे चित्रीकरण होणार असून ते गिनिज रेकॉर्डसाठीही पाठविले जाईल, असे या मोहिमेच्या आयोजकांनी सांगितले. या मोहिमेतून उभारण्यात येणारा निधी डॉ. प्रकाश आमटे यांच्या हेमलकसास्थित लोकबिरादरी प्रकल्पाला दान करण्यात येईल. आदिवासी व दुर्गम भागातील खेळाडूंच्या विकासासाठी या निधीचा उपयोग होईल, अशी माहिती समर्थ यांनी दिली.रेस अ‍ॅॅक्रॉस अमेरिका तसेच ‘ट्रान्स सायबेरियन एक्स्ट्रीम’ ही जगातील अत्यंत खडतर रेस पूर्ण करणारे आशियातील एकमेव सायकलपटू समर्थ हे स्कॉट स्पोर्टस्‌ इंडियाचे ब्रँड अ‍ॅॅम्बेसिडर आहेत.  ‘मुंबईतून मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर दक्षिणेत चेन्नईच्या दिशेने कूच होईल. चेन्नईचा निरोप घेतल्यानंतर कोलकाताच्या दिशेने प्रवास सुरू होईल. त्यानंतर बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि पुन्हा मुंबईत येणार आहे. दररोज कमीतकमी विश्रांतीसह ४५० किमी अंतर पार करण्याचे लक्ष्य बाळगले आहे. दक्षिण भारतातील उकाडा आणि उत्तर भारतातील कडाक्याची थंडी असा अनुभव या मोहिमेच्यानिमित्ताने येईल. हे आव्हान पेलण्यासाठी मी पूर्णपणे सज्ज आहे,’ असा विश्वास समर्थ यांनी व्यक्त केला.

शारीरिक क्षमता पाहणारी मोहीमदेशाच्या अनेक शहरांना वळसा घेत ६ हजार किमी सायकल प्रवासाचा हा पहिलाच प्रयत्न असल्याचा दावा समर्थ यांनी केला. समर्थ यांच्या या खडतर मोहिमेची तंतोतंत माहिती उपग्रहाच्या माध्यमातून मिळू शकेल. यासाठी विशेष ‘www.rideacrossindia.com’ हे संकेतस्थळही तयार करण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान अमित समर्थ यांच्या हृदयाची गती, शारीरिक क्षमता, हवामान, ऑक्सिजनचे प्रमाण आदींची माहिती ठेवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रांचा वापर करण्यात येत आहे.

टॅग्स :bycycle rallyसायकल रॅली