अजय सिंगने पटकावले विक्रमी सुवर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 04:59 AM2019-07-13T04:59:26+5:302019-07-13T04:59:31+5:30

राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग : आॅलिम्पिक पात्रतेचा गुणही मिळवला

Ajay Singh won the record gold | अजय सिंगने पटकावले विक्रमी सुवर्ण

अजय सिंगने पटकावले विक्रमी सुवर्ण

googlenewsNext

आपिया : भारतीय वेटलिफ्टिर अजय सिंग याने शुक्रवारी क्लिन अ‍ॅँड जर्क प्रकारात नवा राष्ट्रकुल विक्रम नोंदवत सुवर्णपदक पटकावले. २२ वर्षाच्या अजय सिंगने ८१ किलो वजन गटात क्लिन अ‍ॅँड जर्क प्रकारात आपल्या वजनाच्या दुप्पट (१९० किलो) वजन उचलले. तसेच त्याने आॅलिम्पिक पात्रतेसाठी गुणही मिळवला.
आशियाई युवा वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्य पदक मिळवलेल्या अजयसिंग याने स्नॅच प्रकारात १४८ किलो वजन उचलले. त्यामुळे त्याचे एकूण वजन ३३८ किलो झाले. अजयची ही कामगिरी आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट आहे.
या गटात भारताच्या पापुल चांगमई याने रौप्य पदक मिळवले. चांगमई याने एकूण ३१३ किलो (१३५ व १७८) वजन उचलले. महिलांच्या ८७ किलो गटात पी. अनुराधाने २२१ किलो वजन उचलले. पुरुषांच्या ८९ किलो गटात राष्टÑकुल सुवर्ण विजेता आर. व्ही. राहुल कुल याने ३२५ किलो उचलत दुसरा क्रमांक पटकावला.

Web Title: Ajay Singh won the record gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.