कराची : पाकिस्तान संघाचा आक्रमक अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदी याची सध्या सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकानंतर राष्ट्रीय संघाच्या कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात येईल, अशी घोषणा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी सोमवारी केली. याशिवाय, सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील आफ्रिदीचे दिवस संपत आल्याचे संकेतही त्यांनी दिले.कोलकाता येथून परतल्यानंतर लाहोरमध्ये पत्रकारांशी बोलताना शहरयार म्हणाले, ‘‘विश्वचषकानंतर निवृत्त होण्यावर बोर्ड आणि आफ्रिदी यांच्यात सहमती झाली होती. या सहमतीअंतर्गत आफ्रिदी टी-२० विश्वचषकापर्यंत कर्णधार आहे. स्पर्धेनंतर निवृत्त होण्याची त्याने तयारीदेखील दशर््विली होती. त्याने मतपरिवर्तन केले आणि खेळणे सुरू ठेवले, तरीही खेळाडू म्हणून त्याची निवड होते का, हे पाहावे लागेल.’’ मागच्या वर्षी आफ्रिदीला राष्ट्रीय टी-२० संघाचा कर्णधार बनवून कुठलीही चूक केली नसल्याचे शहरयार यांनी स्पष्ट केले. पाकमध्ये आफ्रिदीचा दर्जा मोठा आहे. भूतकाळात त्याच्या बळावर आम्ही अनेक सामने जिंकले. त्याची विश्वचषकात निवड होणे तार्किक होते. संघाने मोठा सामना गमावताच त्याच्यावर टीका होणे स्वाभाविक आहे. माझ्या मते, आफ्रिदीला सर्वांचा पाठिंबा हवा, असे सांगून शहरयार यांनी विश्वचषकानंतर पाक संघासाठी नवा कोच शोधण्याची मोहीम हाती घेण्याचेदेखील संकेत दिले. (वृत्तसंस्था)
विश्वचषकानंतर आफ्रिदीची हकालपट्टी
By admin | Updated: March 22, 2016 02:52 IST