वकिलांचे जेधे चौकात आंदोलन
By admin | Updated: September 6, 2015 23:09 IST
पुणे : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात होण्यासाठी पुणेकर खंडपीठ मागणी कृती समिती व पुणे बार असोसिएशनतर्फे सलग पाचव्या दिवशी आंदोलन केले. शनिवारी स्वारगेट येथील जेधे चौकात आंदोलन करण्यात आले.
वकिलांचे जेधे चौकात आंदोलन
पुणे : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात होण्यासाठी पुणेकर खंडपीठ मागणी कृती समिती व पुणे बार असोसिएशनतर्फे सलग पाचव्या दिवशी आंदोलन केले. शनिवारी स्वारगेट येथील जेधे चौकात आंदोलन करण्यात आले. आंदोलनात अध्यक्ष ॲड गिरीश शेडगे, उपाध्यक्ष ॲड योगेश पवार, हेरंब गानू, सचिव राहुल झेंडे, सुहास फराडे, खजिनदार ॲड. साधना बोरकर तसेच पुणे बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ वकील व नागरिक सहभागी झाले होते. सलग पाचव्या दिवशी आंदोलन असुनही सरकार अथवा लोकप्रतीनिधी यांनी दखल घेतली नाही. जो पयंर्त ठोस निर्णय अथवा आश्वासन मिळत नाही तोपयंर्त हे आंदोलन असेच चालू राहणार आहे, असे असोसिएशनतर्फे स्पष्ट करण्यात आले. येत्या सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता बालगंधर्व चौकात जंगली महाराज रस्त्यावर आंदोलन केले जाणार आहे.------------