शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बालेवाडी संकुलात रनिंग ट्रॅकवर वाहने नेल्याप्रकरणी प्रशासनाची दिलगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2021 05:27 IST

क्रीडामंत्र्यांकडून दखल : वाहनांना प्रवेश न देण्याचे आदेश

पुणे : बालेवाडी-म्हाळुंगे येथील छत्रपती शिवाजी क्रीडा संकुलातील समारंभादरम्यान आंतरराष्ट्रीय सिंथेटिक रनिंग ट्रॅकवर शनिवारी वाहने नेल्याप्रकरणी क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि क्रीडा संकुल प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.

नियोजित क्रीडा विद्यापीठासाठी या संकुलाची पाहणी आणि आढावा बैठक घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार आणि अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांचा लवाजमा उपस्थित झाला होता. या मंडळींच्या वाहनांनी सर्व नियमांचे उल्लंघन करून रनिंग ट्रॅकवर वाहने नेली. याप्रकरणी धावपटू, क्रीडाप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. रनिंग ट्रॅकवर कसे वावरावे याचे मूलभूत ज्ञान नसलेली ही मंडळी ‘क्रीडा विद्यापीठ‘ काय काढणार, असा संताप धावपटूंकडून व्यक्त होत आहे. याप्रकरणी राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी दखल घेत यापुढे रनिंग ट्रॅकवर वाहनांना प्रवेश न देण्याचे आदेश दिले. शरद पवार यांच्या पायाला त्रास होत असल्याने एकाच वाहनाला काँक्रीटवरून जाण्यास परवानगी दिली होती. मात्र, त्याच वेळी काही वाहने थेट रनिंग ट्रॅकवर आल्याची घटना घडली.  या प्रकरणी क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांनीही  लेखी खुलासा केला आहे.

बालेवाडी क्रीडा संकुल येथील रनिंग ट्रॅकवर कालच्या कार्यक्रमावेळी गाड्या लावण्यात आल्या.  ही चूक भविष्यात होणार नाही यासाठी आम्ही काळजी घेत आहोत. आम्ही त्या ठिकाणी व्हीआयपी गाड्यांना परवानगी दिली होती. परंतु, त्या गाड्या नेमक्या कुठे लावायच्या? कशा पद्धतीने लावायच्या? याबाबतीत सूचना देण्यास कमी पडलो.   ही आमच्या नियोजनातील मोठी चूक आहे.     - ओमप्रकाश बकोरिया, क्रीडा आयुक्त

टॅग्स :Balewadiबालेवाडी