शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा महोत्सवात अकोला, अचलपूरच्या विद्यार्थ्यांची बाजी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 21:18 IST

२२ चमूंचा सहभाग : तंत्रनिकेतनचा क्रीडा महोत्सव

अमरावती : तंत्रनिकेतन स्तरावर आयोजित क्रीडा महोत्सवात १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अकोल्याच्या खेळाडूंनी प्रथम, तर खामगावच्या खेळाडूंनी द्वितीय क्रमांक पटकाविला. उंच उडीमध्ये अचलपूरचा विद्यार्थी अव्वल ठरला. महाराष्ट्र राज्य तंत्रनिकेतन मंडळ (मुंबई) द्वारे आयोजित एच झोन अंतर्गत  डॉ. पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतनच्या पुढाकाराने शुक्रवारी श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या मैदानावर क्रीडा महोत्सव पार पडला.

उद्घाटन प्राचार्य पी.व्ही. देशमुख यांनी केले. गोळाफेक, धावण्याची शर्यत, थाळीफेक, भालाफेक यांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एच झोन अंतर्गत औषधनिर्माणशास्त्र व तंत्रनिकेतनच्या एकूण २२ चमूंनी सहभाग नोंदविला. १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अकोलाच्या गीतादेवी खंडेलवाल फार्मसी कॉलेजच्या गणेश जायभायेने प्रथम क्रमांक पटकाविला. खामगाव येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या निशांत चांडकने  द्वितीय क्रमांक मिळविला.

उंच उडीमध्ये अचलपूर येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या कुलदीप काळे याने प्रथम, तर अमरावती येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या अनुराग जैसवाल याने द्वितीय क्रमांक पटकावला. लांब उडीमध्ये गणेश अखाडे व पुष्पक सवांग प्रथम-द्वितीय ठरले. स्पर्धा आयोजनामध्ये पी.व्ही ठाकरे, पी.एस. खोने, जी.पी. दातीर, आर.एम घरत, जे.जी. साबळे, एस.एन. उघडे, मोहन ठाकरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. विजयी स्पर्धकांना ए.बी. सांगोळे, एन.डी . दुधे , एम.एच. चोरे आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

टॅग्स :Amravatiअमरावती