शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

अभिषेक वर्माला सुवर्ण तर सौरभ चौधरीला कांस्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 4:45 AM

नेमबाजी विश्वचषक : रौप्य पदकासह संजीव राजपूतने मिळवले आॅलिम्पिक तिकिट

रिओ : येथे सुरू असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी चांगली कामगिरी केली आहे. पुरुषांच्या १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात गुरुवारी अभिषेक वर्माने सुवर्ण तर सौरभ चौधरीने कांस्यपदक जिंकले. अंतिम फेरीत अभिषेक वर्माने २४४.२ तर सौरभ चौधरीने २२१.९ गुणांची कमाई केली.

तुर्कीच्या इस्माईल केलेसने २४३.१ गुणांसह रौप्यपदक कमावले. सौरभने यंदा पाच सुवर्णांची कमाई केली असून वर्षभरातील हे त्याचे सहावे आयएसएसएफ विश्वपदक होते. भारत पदकतालिकेत दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदकासह अव्वल स्थानावर कायम आहे. चिंकी यादव २५ मीटर महिला पिस्तुलमध्ये अंतिम पात्रता मार्कपासून एका गुणाने माघारली. ती ५८४ गुणांसह दहाव्या स्थानी आली.अनुराज सिंग ५७९ गुणांसह २५ व्या आणि अभिज्ञा पाटील ५७२ गुणांसह ५३ व्या सञथानावर राहीली. चैनसिंग आणि पारूल कुमार यांना ५० मीटर रायफल थ्रो पोझिशनमध्ये क्रमश: ४९ आणि ५७ वे स्थान मिळाले. महिलांच्या २५ मीटर पिस्तुल प्रकारात राही सरनोबत आणि मनू भाकर यांनी क्रमश: ५८० आणि ५८३ गुणांची कमाई केली. दोघींनीही आधीच आॅलिम्पिक कोटा मिळविला आहे. स्वप्निल कुसाळे व ऐश्वर्यसिंग यांनी पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्रो पोझिशनमध्ये ११६६ आणि ११६५ गुण संपादन केले. (वृत्तसंस्था)१० मीटर एअर पिस्तुल प्रकारात अभिषेक आणि सौरभ या दोन्ही भारतीय खेळाडूंनी आॅलिम्पिक प्रवेश याआधीच निश्चित केला आहे. याव्यतिरीक्त संजीव राजपूत याने ५० मीटर रायफल थ्रो पोझिशन अंतिम फेरीमध्ये रौप्य जिंकून आगामी आॅलिम्पिक स्पर्धेचे तिकीट पक्के केले आहे.

तांत्रिक बिघाडामुळे अडचण५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात भारताच्या संजीव राजपूतने रौप्यपदकाची कमाई करीत आॅलिम्पिक कोटा मिळवला. गुण दर्शविणाऱ्या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने त्याच्या शॉटवर शून्य गुण दाखविण्यात आल्याने दडपण येताच तो त्रस्त होता. संजीवने स्वत: हा खुलासा केला.३८ वर्षांच्या संजीवने अंतिम फेरीत ४६२ गुणांची कमाई केली. तो क्रोएशियाचा पीटर गोर्सा (४६२.२) नंतर दुसºया स्थानी राहिला. संजीव म्हणाला, ‘मी संपूर्ण पात्रता फेरीदरम्यान त्रस्त होतो. माझ्या शॉटवर शून्य गुण दाखविण्यात आला होता. याचा विरोध केला. यावर अतिरिक्त शॉट मंजूर होताच मी दहा गुण घेत पात्रता गाठली. माझे गुण ११८० नव्हे, तर ११८१ असायला हवे असे माझे मत होते.’ राजपूत अखेरच्या शॉटमध्ये थोडा मागे राहिल्याने त्याचे सुवर्ण हुकले. ‘दीर्घकाळानंतर फायनलमध्ये खेळल्याने माझ्यावर दडपण आले होते,’ असे त्याने रौप्य जिंकल्यानंतर सांगितले.