शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अभिजित कटके यंदाचा महाराष्ट्र केसरी, अंतिम लढतीत किरण भगतला केले चितपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 19:21 IST

पुण्याचा पैलवान अभिजित कटके यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. अभिजित कटकेने एकतर्फी झालेल्या अंतिम लढतीत साताऱ्याच्या किरण भगतला चितपट करत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली.  

पुणे - पुण्याचा पैलवान अभिजित कटके यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. अभिजित कटकेने एकतर्फी झालेल्या अंतिम लढतीत साताऱ्याच्या किरण भगतला चितपट करत महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली. अभिजित कटके आणि किरण भगत यांच्यातील अंतिम लढ  सुरवातीला अटीतटीची झाली.  मात्र अभिजित कटकेने किरणला चितपट करत 10 विरुद्ध 7 गुणांची आघाडी घेत विजेतेपदावर कब्जा केला. 

 काल झालेल्या गादी आणि माती विभागाच्या अंतिम लढतींमध्ये अनुक्रमे अभिजित कटके आणि किरण भगत यांनी विजय मिळवले होते. गादी विभागात अंतिम फेरीच्या लढतीत अभिजित कटकेने सुरुवातीपासून घेतलेला आक्रमक पवित्रा त्याच्या एकतर्फी विजयाचा शिल्पकार ठरला होता.. आपल्या उंचीचा आणि भक्कम ताकदीचा उपयोग करत अभिजितने एकेरी पट, भारंदाज हप्ते डाव करत १० गुण मिळवून तांत्रिक गुणाधिक्यावर विजय मिळवित सलग दुस-या वर्षी महाराष्ट्र केसरी किताबाच्या अंतिम फेरीत धडक मारली होती.दुस-या बाजूला साता-याच्या किरण भगतने प्रेक्षणीय लढती करत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. माती विभागात अंतिम फेरीत बलाढ्य ताकदीचा बाला रफीक शेख याच्याबरोबर दिलेली चिवट झुंज त्याच्या वर्षभराच्या मेहनतीचे फळ देऊन गेली. आपल्या झुंजार खेळाच्या प्रदर्शनाने किरण भगतने अनपेक्षित अशी आक्रमणे करत बाला रफीकला हतबल केले आणि डोळ््याच्या पापण्या मिटण्याइतक्या अवधीत एकेरी कस काढून चितपट करीत माती विभागातून महाराष्ट्र केसरी किताबाच्या अंतिम लढतीसही आपले आव्हान उभे केले होते.

टॅग्स :Sportsक्रीडा