ऑनलाइन लोकमतलंडन, दि. १८ - मोहम्मद आमिर आपले नवे आयुष्य जगण्यासाठी तयार असल्याचे वक्तव्य पाकिस्तान कसोटी संघाचा कर्णधार मिसबाह उल हक याने केले. यजमान इंग्लंडला पहिल्या कसोटी सामन्यात नमवल्यानंतर मिसबाहने आमिरविषयी प्रतिक्रीया दिली.आमिर २००१ साली लॉडर््समध्ये स्पॉट फिक्सिंगप्रकरणी दोषी ठरला होता. त्यानंतर त्याच्यावर बंदी घातली होती आणि आता त्याच लॉडर््स मैदानापासून आमिरने आपल्या कसोटी क्रिकेटला पुन्हा सुरुवात केली. या सामन्यात आमिरने १७.५ षटकात ३९ धावांत दोन बळी घेतले.ह्यह्यआमिरसाठी ही विशेष वेळ आहे. आता तो आपल्या आयुष्याला नव्याने सुरुवात करु शकतो. तो नक्कीच आपल्या कामगिरीने स्वत:ला एक चांगला क्रिकेटरसह उत्तम व्यक्ती म्हणून सिध्द करेल,ह्णह्ण असे मिसबाहने सांगितले. तसेच, आमिर खूप भाग्यशाली असून पुन्हा त्याला खेळण्याची संधी मिळाली आहे. हे त्याच्यासाठी नवे आयुष्य आहे, असेही मिसबाहने यावेळी सांगितले. (वृत्तसंस्था)
आमिर नव्या आयुष्यासाठी सज्ज - मिसबाह
By admin | Updated: July 18, 2016 21:58 IST