शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

आमीर खान पत्नीला देणार घटस्फोट, द्यावी लागणार निम्मी संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2017 21:16 IST

आमीर खान घटस्फोट घेत असून त्याला आपल्या संपत्तीमधील आर्धी रक्कम आपल्या पत्नीला द्यावी लागणार आहे.

नवी दिल्ली, दि. 3 - आमीर खान घटस्फोट घेत असून त्याला आपल्या संपत्तीमधील  निम्मी रक्कम आपल्या पत्नीला द्यावी लागणार आहे. पाकिस्तानी वंशाचा ब्रिटनचा लोकप्रिय बॉक्सर आमीर खान पत्नी फरयाल मकदुम हिला घटस्फोट देत आहे. त्यासाठी त्याला आपल्या संपत्तीमधील आर्धी रक्कम पत्नीला द्यावी लागणार आहे. द डेली स्टारने या संदर्भातील बातमी दिली आहे. त्यानुसार आमीर खानला 100 कोटी रुपये म्हणजे १ अब्ज रूपये मोजावे लागतील असे सांगितले जात आहे. 2013 मध्ये आमीर विवाहबद्ध झाला होता.

माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार सॉलिसिटर जनरल हाराल्ड वॉक्स यांच्या म्हणण्यानुसार आमीरने घटस्फोट घेतला तर त्याला किमान 1 अब्ज रूयपे पत्नीला द्यावे लागतील. आमीरची बायको फरयाल हिच्या म्हणण्यानुसार आमीर सतत बायकांच्या गराड्यात असतो, दारू पितो, पार्ट्या करतो आणि स्वतःला तरीही मुसलमान म्हणवतो. याउलट आमीरच्या म्हणण्यानुसार त्याची बायको त्याच्याशी प्रामाणिक नाही व दुसर्‍या बॉक्सरबरोबर तिचे संबंध आहेत. फरयाल ही अमेरिकन मॉडेल असून तिला आमीरपासून एक मुलगी आहे व दुसर्‍यांदा ती प्रेग्नंट आहे.

आमीरकडे ७ लाख पौंड किंमतीच्या कार्स, 16 लाख पौंड किमतीचा महाल शिवाय 25 दशलक्ष पौंडांची मालमत्ता आहे. या 25 दशलक्षांपैकी निम्मी म्हणजे किमान 12.5 दशलक्ष पौंड त्याला पत्त्नीला मुलांचा सांभाळ करण्याचा खर्च म्हणून द्यावे लागतील.

आमिरच्या घरात कौटुंबिक वाद सुरु आहेत. फरयालने आरोप केला होता की, आमिरचे आई-वडिल व त्याची बहिण-भाऊ माझा मानसिक छळ करत आहेत. तसेच कपडे घालण्यावरून मारहाण झाल्याचा दावाही तिने केला होता. फरयालने हा ही आरोप केला होता की, जेव्हा ती प्रेग्नंट राहिली तेव्हापासूनच त्यांनी घटस्फोटासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला.आमीर खानचा सेक्स टेप झाला होता लीकआमीर खानचा एक सेक्स टेप पॉर्न साईटवर लीक झाला होता. धक्कादायक बाब ही की, या व्हिडिओ लीक करण्यामागे त्याची मॉडेल पत्नी फरयाल मखदूम हिचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. या सेक्स टेपमध्ये 30 वर्षाचा आमीर खान हा अमेरिकेच्या एका मॉडेलसोबत होता. स्काईपवर बोलताना त्याने सेक्शुअल अ‍ॅक्ट करणे सुरु केले. रिपोर्ट्समध्ये हा दावा सुद्धा करण्यात आला आहे की, बॉक्सर आमिरचे आणखी तीन सेक्स व्हिडिओज सुद्धा त्या वेबसाईट्सला देण्याची ऑफर दिली होती.