शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
2
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
3
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
5
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
6
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
7
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
8
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
9
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
10
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
11
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
12
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
13
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
14
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
15
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
16
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
17
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
18
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
19
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
20
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
Daily Top 2Weekly Top 5

अमली पदार्थांच्या विरोधात लढा देणारी बंदरिका खारकोंगोरचा 'पंजा'! शिलाँगच्या कन्येची हवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 20:06 IST

मुंबई : भारतात वेगवेगळ्या लीग होत आहेत आणि यातून नवनवीन युवा चेहरे समोर येत आहेत.

मुंबई : भारतात वेगवेगळ्या लीग होत आहेत आणि यातून नवनवीन युवा चेहरे समोर येत आहेत. आयपीएल, प्रो कबड्डी, टेबल टेनिस लीग, टेनिस लीग, बुद्धीबळ लीग अशा लीगमध्ये भारतीय संघांना फ्युचर स्टार मिळत आहेत. या लीग्सच्या यादीत आणखी एक लीग दाखल झाली आहे आणि त्यात शिलाँगची कन्या प्रतिस्पर्धींना चांगलाच इंगा दाखवताना दिसत आहे.  चेहऱ्यावर निरागसता दिसणाऱ्या २३ वर्षीय बंदरिका खारकोंगोरने पंजा लीगमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

मेघालयातील शिलाँग येथील बंदरिका मुंबईस्थित फ्रँचायझी मुंबई मसलसाठी पंजा लीगच्या पहिल्या पर्वात खेळतेय.  ती तिच्या तीन बहिणी आणि आईसोबत राहते. तिने सेंट एडमंड कॉलेज, शिलाँगमधून बॅचलर ऑफ सोशल वर्कमध्ये ग्रॅज्युएशन केले आहे. आता फॅशनमध्ये डिप्लोमा करत आहे. शिलाँगमध्ये ती अंमली पदार्थांच्या गैरवापराच्या विरोधात लढा देणारी एक सामाजिक कार्यकर्ती आहे. लहानपणापासून बंदरिकाला खेळाची आवड होती, पण आपण आर्म रेसलर होऊ असे तिला कधीच वाटले नव्हते. 

''एकदा कॉलेजमध्ये आर्म रेसलिंग स्पर्धेत सहभाग घेतला अन् मी  महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये जिंकली आणि नंतर आंतर-महाविद्यालयीन स्पर्धांसाठी माझी निवड झाली. त्या वेळी जे रेफरी आमच्या कॉलेजला भेट देत असत, त्यांनी मला सांगितले की, जर मला आर्म रेसलिंग हा खेळ म्हणून निवडायचा असेल तर मी त्याचं गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे आणि कठोर परिश्रम केले पाहिजे, मग यश मिळू शकेल,” ती पुढे म्हणाली.   बंदरीकाने तिच्या यशाचे श्रेय आईला दिले. तिच्या संपूर्ण प्रवासात आईने तिच्या पाठीशी खंबीर उभी राहिली. पूर्वोत्तर प्रदेशातून त्रिदीप मेधी, चेतना शर्मा आणि रिबासुक लिंगडोह मावफ्लांग हेही खेळाडू या खेळात नाव गाजवत आहेत.  पंजा लीगमध्ये भाग घेतल्यानंतर, बंदरिका आगामी जागतिक आर्म रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेणार आहे, जी २४ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२३ दरम्यान अल्माटी, कझाकस्तान येथे होणार आहे.

टॅग्स :shillong-pcशिलांगIndiaभारत