शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

Commonwealth Games:८८ वर्षांपूर्वी 'या' पैलवानाने मिळवून दिले होते भारताला पहिले राष्ट्रकुल पदक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 12:35 IST

तब्बल ८८ वर्षांपूर्वी भारताच्या पैलवानाने राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पदक मिळवले होते.

Rashid Anwar । नवी दिल्ली : भारतासह जगभर सध्या राष्ट्रकुल स्पर्धेची चर्चा रंगली आहे. खरं तर या राष्ट्रकुल स्पर्धेची (Commonwealth Games) सुरूवात १९३० मध्ये झाली होती, मात्र तेव्हा भारताला यामध्ये सहभागी होत आले नव्हते. भारताला या बहुचर्चित स्पर्धेत सहभागी होण्याची संधी १९३४ मध्ये मिळाली. तेव्हा राष्ट्रकुल स्पर्धांना 'ब्रिटिश एम्पायर गेम्स' म्हणून ओळखले जात होते. लंडनमध्ये पार पडलेल्या या ब्रिटिश एम्पायर गेम्समध्ये भारताने थलेटिक्स आणि कुस्तीमध्ये ६ खेळाडूंचा गट पाठवला होता. या ६ खेळाडूंमधीलच एक नाव म्हणजे राशिद अनवर (Rashid Anwar)होते, ज्यांनी राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताच्या विजयाचे खाते उघडले. राशिद यांनी तेव्हा कांस्य पदक जिंकून भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. 

राशिद अनवर यांचा जन्म १२ एप्रिल १९१० रोजी झाला होता. विशेष म्हणजे ते रेल्वेमध्ये नोकरी करत असताना त्यांची पोस्टिंग उत्तर प्रदेशातील लखनौ येथे झाली होती. या नोकरीसोबतच ते कुस्तीचे डावपेच शिकत गेले. माहितीनुसार, ते कुस्तीतील वेल्टरवेट श्रेणीमध्ये ८ वेळा नॅशनल चॅम्पियन राहिले होते. १९३४ मध्ये जेव्हा त्यांना एवढ्या मोठ्या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली तेव्हा त्यांनी कांस्य पदकावर आपले नाव कोरले.  

१९४० मध्येही होते पदकाचे प्रबळ दावेदार राशिद अनवर यांनी १९३६ मध्ये बर्लिन ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. मात्र या ऑलिम्पिकमधील दुसऱ्या राउंडमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि ते बाहेर झाले. १९४० च्या ऑलिम्पिकसाठी अनवर यांनी जोरदार तयारी केली होती मात्र दुसऱ्या युद्धाच्या कारणास्तव ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती. या ऑलिम्पिकमध्ये राशिद यांना पदकाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. कारण १९४० च्या ऑलिम्पिक आधी त्यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चॅम्पियन पैलवान अल फुलर आणि बिली रिले यांना चितपट केले होते. त्यांच्या कुस्तीतील एका डावाला तर 'स्विंगिंग बोस्टन क्रॅब' असे नाव देण्यात आले होते. 

संघर्षमय प्रवास दुसऱ्या विश्व युद्धामुळे राशिद आणि कुस्ती यामधील अंतर वाढू लागले होते. कारण युद्धामुळे मोठ्या कालावधीपर्यंत स्पर्धांचे आयोजन होत नव्हते. अशा परिस्थितीत युद्धाच्या काळात राशिद यांनी रूग्णवाहिकेवर चालक म्हणून देखील काम केले. १९५७ मध्ये त्यांनी पुन्हा एकदा कुस्तीच्या मैदानात पाय ठेवला आणि १९५९ मध्ये एका प्रसिद्ध सामन्यात चॅम्पियन हान्स स्ट्रीगरचा पराभव केला. यानंतर वाढत्या वयामुळे त्यांची कुस्तीवरील पकड हळूहळू ढासळत गेली. अखेर १९७३ मध्ये या संघर्षमय योद्ध्याची प्राणज्योत मावळली, तेव्हा ते लंडनमधील कॅमडेन येथे राहत होते. 

 

टॅग्स :Commonwealth Games 2022राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021Wrestlingकुस्तीLondonलंडनIndiaभारत