शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

३६ वर्षांनंतर महिला हॉकीचे सुवर्ण जिंकण्याची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 07:28 IST

जपानविरुद्ध भारताचा अंतिम सामना आज

जकार्ता : २० वर्षानंतर अंतिम फेरी गाठल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय महिला हॉकी संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेत अंतिम सामन्यात शुक्रवारी जपानविरुद्ध लढत द्यायची आहे. ३६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सुवर्णपदकाचा दुष्काळ संपविण्याची हीच संधी असेल. त्याचवेळी पुरुष संघाच्या अनपेक्षित पराभवाचे दडपण येऊ न देता सकारात्मक खेळ करण्याचे आव्हानही भारतीय महिलांपुढे असेल.मागच्या स्पर्धेतील कांस्यविजेत्या भारताने बुधवारी उपांत्य सामन्यात चीनवर १-० ने विजय नोंदवून २० वर्षानंतर आशियाडच्या अंतिम फेरीत धडक दिली. याआधी १९९८ च्या बँकॉक आशियाडमध्ये अंतिम सामना खेळणारा भारतीय संघ कोरियाकडून पराभूत झाला होता. भारताने एकमेव सुवर्ण जिंकले ते १९८२ च्या दिल्ली आशियाडमध्ये. एकूण नऊ वेळेपैकी भारताच्या खात्यात आतापर्यंत एक सुवर्ण, एक रौप्य आणि तीन कांस्य अशी पाच पदकांची नोंद झाली.

विश्व क्रमवारी तसेच या स्पर्धेतील आतापर्यंतची कामगिरी पाहता नवव्या स्थानावरील भारत १४ व्या स्थानावरील जपानविरुद्ध विजयाचा प्रबळ दावेदार मानला जातो. पुरुष संघाप्रमाणे भारतीय महिला संघानेही सर्वांना चकित केले. संघाला एकही पराभव पत्करावा लागला नाही. इंडोनेशियावर ८-०, कझाखस्तानवर २१-०, कोरिया ४-१ आणि थायलंडवर ५-० अशा विजयाची नोंद केली. भारतीय संघाचा बचाव देखील शानदार ठरला.भारतीय संघाची कर्णधार राणी रामपाल हिने येथे सुवर्ण जिंकून 2020 च्या आॅलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळविण्याचा निर्धार व्यक्त केला. आक्रमक फळीत अनुभवी वंदना कटारिया आणि स्वत: राणीचा समावेश असून दोघींनी पाच सामन्यात येथे ३९ गोल केले.

टॅग्स :Asian Games 2018आशियाई क्रीडा स्पर्धा