शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

अ‍ॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स एशियन स्पर्धेत भारताच्या संघात १७ मुंबईकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2023 16:56 IST

मुंबई : उझबेकिस्तानमध्ये पुढील महिन्यात होणार्‍या अ‍ॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स एशियन स्पर्धेसाठी भारताच्या संघात 17 मुंबईकर खेळाडूंचा समावेश आहे. 

उझबेकिस्तानमध्ये पुढील महिन्यात होणार्‍या अ‍ॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स एशियन स्पर्धेसाठी भारताच्या संघात 17 मुंबईकर खेळाडूंचा समावेश आहे. 

आशिया खंडातील एका सर्वोत्तम स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व मुंबईचे जिम्नॅस्ट हे लोकमान्य शिक्षण संस्थेच्या श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन चेंबूरच्या अ‍ॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेतात. त्यात 13 ते 17 वर्षे वयोगटातील यज्ञेश भोस्तेकर, समर्थ खन्नूकर, नमोह उनियाल आणि अश्विन गोसावी या चौघांची ज्युनियर संघात निवड झाली आहे. ऋतुजा जगदाळे, प्रीती एखंडे, आदित्य खसासे, आकाश गोसावी, आचल गुरव, आशुतोष  रेणावकर, अक्षता ढोकळे, अर्ना पाटील, सोनाली बोराडे, नमन महावर, रितेश बोराडे, कुणाल कोठेकर आणि प्रशांत गोरे या मुंबईच्या जिम्नॅस्टचा15 ते 28 वर्षे वयोगटात (सीनियर) समावेश आहे. वेगवेगळ्या शाळा आणि निवडक कंपन्यांमधून या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. 

सर्व जिम्नॅस्टना प्रशिक्षक राहुल ससाणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. ससाणे हे शिवछत्रपती पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आहेत. त्यांनी अनेक जागतिक स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे. राहुल यांना योगेश पवार (शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि जज) आणि सुनील रणपिसे (आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक आणि जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते) या दोन प्रशिक्षकांचे सहकार्य लाभले आहे. सर्व प्रशिक्षक हे गेली अनेक वर्षेकोणतेही शुल्क न घेता प्रशिक्षण देत आहेत.अ‍ॅक्रोबॅटिक जिम्नॅस्टिक्स एशियन स्पर्धा उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे 18 ते 20 ऑक्टोबर 2023 दरम्यान होणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचे एकूण 46 जिम्नॅस्ट आणि सपोर्ट स्टाफ सहभागी होणार आहे.  

टॅग्स :Mumbaiमुंबई