विराटने दत्तक घेतली ती 15 कुत्री

By admin | Published: April 18, 2017 03:00 PM2017-04-18T15:00:36+5:302017-04-18T15:00:36+5:30

विराटने मात्र खरोखरच्या भूतदयेचे दर्शन घडवताना अपंगत्व आलेल्या 15 कुत्र्यांना दत्तक

15 dogs of Virat adopted | विराटने दत्तक घेतली ती 15 कुत्री

विराटने दत्तक घेतली ती 15 कुत्री

Next
>ऑनलाइन लोकमत
बंगळुरू, दि. 18 - आयपीएलच्या यंदाच्या हंगामात रॉयल चॅलॆंजर्स बंगळुरूच्या संघाला अद्याप चांगली कामगिरी करून दाखवता आलेली नाही. मैदानाबाहेरील एका कामगिरीसाठी सध्या विराटचे कौतुक होत आहे. मैदानावर आक्रमक असलेला विराट कोहली मैदानाबाहेर पशु पक्ष्यांच्याबाबतीत तेवढाच हळवा आहे. भूतदया, प्राणीप्रेम म्हटले की आपल्याला घरी पाळलेली, गोंडस मांजरे, कुत्री नजरेसमोर दिसतात. पण विराटने मात्र खरोखरच्या भूतदयेचे दर्शन घडवताना अपंगत्व आलेल्या 15 कुत्र्यांना दत्तक घेतले आहे.  
भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे नेतृत्व करत आहे. या संघाचे बंगळुरूमध्ये होम ग्राऊंड आहे. विराटने बंगळुरूमध्ये असताना रविवारी वेळात वेळ काढून चार्ली अॅनिमल रेस्क्यू सेंटरला (केअर) भेट दिली. कोहलीच्या या भेटीची माहिती देताना या  केंद्राच्या विश्वस्थ सुधा नारायणन म्हणाल्या,  विराट आमच्या संस्थेला भेट देईल याची कल्पना नव्हती. आम्हाला केवळ व्हीआयपी भेटीबाबत माहिती देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात विराटची भेट आम्हाला आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. ही भेट 10 मिनिटांची नियोजित होती. पण विराट जवळपास 45 मिनिटे येथे थांबला. 
विराट येथील प्राण्यांची खूप आस्थेने विचारपूस करत होता. त्याने आमच्या संपूर्ण केंद्राचा फेरफटका मारला. येथे प्राण्यांना कसे आणले जाते. त्यांचे पुनर्वसन कसे होते. हे सेंटर ट्रॉमा केअर युनिट कसे चालवते वगैरेचीं माहिती त्याने घेतली., असे हे केंद्र चालवणाऱ्या नारायणन यांनी दिली.  
 

Web Title: 15 dogs of Virat adopted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.