शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

जिल्हा परिषदेला हवी मदत

By admin | Updated: November 24, 2015 01:59 IST

रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाला कोट्यवधीच्या निधीची चणचण भासत आहे. जिल्ह्यातील विविध कंपन्यांनी मदतीचा हात पुढे करावा यासाठी त्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत

आविष्कार देसाई,  अलिबागरायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाला कोट्यवधीच्या निधीची चणचण भासत आहे. जिल्ह्यातील विविध कंपन्यांनी मदतीचा हात पुढे करावा यासाठी त्यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत. मात्र हजारो कोटी रुपयांची उलाढाल असणाऱ्या विविध कंपन्या आपल्या खिशात हात घालायला तयार नसल्याचे दिसते. त्यामुळे स्वच्छता मिशन कसे पूर्ण करायचे याबाबत प्रशासनावर डोक्याला हात लावायची वेळ आली आहे.२०१९ सालापर्यंत जिल्ह्यात एक लाख २७ हजार शौचालये उभारायची आहेत. यासाठी प्रत्येकी सुमारे १२ हजार रुपयेप्रमाणे १५२ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. सरकारकडे एवढ्या मोठ्या संख्येने निधीची कमतरता आहे. ही सर्व शौचालये टप्प्याटप्प्याने बांधायची असल्याने त्याप्रमाणात निधीची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे निधी उभारण्याचे आव्हान तर दुसरीकडे उद्दिष्टपूर्ती करणे असे दुहेरी संकट रायगड जिल्हा प्रशासनापुढे उभे राहिले आहे. सरकारकडे निधी नव्हता, तर एवढे मोठे मिशन हाती घेण्याची सरकारला काय गरज होती असा सूरही आता उमटत आहे.निधीचा प्रश्न सुटावा यासाठी सरकारने एक सुपीक कल्पना बाहेर आणली आहे. जिल्ह्यातील विविध कंपन्यांकडून सीएसआर फंडाच्या माध्यमातून योजना पूर्ण करण्याकडे सरकारचा कल आहे. कंपन्यांनी सामाजिक उत्तरदायित्वातून स्वच्छताविषयक उपक्रम राबवावा. यासाठी १९ नोव्हेंबर २०१४ च्या सरकारी निर्णयाचा आणि कोकण उपआयुक्तांच्या ५ डिसेंबर २०१४ च्या ईमेलचा आधार घेतला आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या स्वच्छता विभागाने जिल्ह्यातील कंपन्यांना त्या त्या स्तरावरील गटविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून पाणी व स्वच्छतेसाठी सीएसआर फंड खर्च करावा. याबाबत पत्रव्यवहार केला आहे, मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद आलेला नाही, अशी माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी दिली. जिल्ह्यात सुमारे २४५ छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत. त्यांची उलाढाल सुमारे ५०० कोटी रुपयांपासून अडीच हजार कोटी रुपयांपर्यंत आहे. या कंपन्या येथे व्यवसाय करुन कोट्यवधी रुपयांचा नफा कमवित आहेत. त्यांचे उत्तरदायित्व म्हणून कंपन्यांनी मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे.