शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

...तर मृतांचा दशविधी रस्त्यावर करू; युवक काँग्रेसचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 14:10 IST

पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी 

नवी मुंबई : सायन पनवेल महामार्गावर भेडसावणाऱ्या समस्यांवरून अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. त्याकरिता तुर्भेतील पीडब्ल्यूडीच्या कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी दोन दिवसात संबंधितांवर गुन्हे दाखल न झाल्यास आजवर महामार्गावर मयत पावलेल्यांचे दशकार्य रस्त्यावर घालू असा इशारा देण्यात आला. सायन पनवेल मार्गावरील समस्या मार्गी लागत नसल्याने दिवसेंदिवस या मार्गावरील प्रवाशी व वाहनचालक यांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. त्यात अनेकांचे प्राणदेखील गेले आहेत. मार्गावरील पथदिवे अनेक ठिकाणी बंद असल्यानेही रात्रीच्यावेळी गैरसोय होत आहे. यामुळे गतमहिन्यात तुर्भे येथील पुलावर अपघातामध्ये शीघ्र कृती दलाच्या जवानाचा तर पुलाच्या उताराला बीएआरसीच्या कर्मचाऱ्याच्या मृत्यूची घटना घडलेली आहे. तर दोन दिवसांपूर्वी सानपाडा पुलाखाली उघड्यावर पडलेल्या विद्युत वायरीमुळे सुरेश जुनघरे या पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. गतवर्षीदेखील पावसाळ्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघात घडून अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. तर यंदाही पावसाच्या सुरवातीलाच महामार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी युवक काँग्रेसच्या वतीने 'बेड्या ठोको' आंदोलन करण्यात आले. युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष निशांत भगत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी संबंधी अधिकारी उपस्थित नसल्याने आंदोलकांच्या शिष्टमंडळाला समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे दोन दिवसात संबंधितांवर गुन्हे दाखल न झाल्यास सायन पनवेल महामार्गावर आजवर अपघातामध्ये मृत पावलेल्याचे दशकार्य रस्त्यावर करण्याचा इशारा निशांत भगत यांनी पीडब्ल्यूडीला दिला आहे.  

टॅग्स :Potholeखड्डे