शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तू मुलगी आहेस, असे खेळ तुझं काम नाही; पण बाप पाठीशी राहिला अन्....

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 06:45 IST

पॉवर गर्ल अमृता भगत हिने उलगडला शेलू ते रोमानियाचा प्रवास

- कांता हाबळेनेरळ :  तू मुलगी आहेस, खेळ तुझं काम नाही, हे मला नातेवाइकांकडून ऐकायला मिळाले; पण वडील पाठीशी उभे राहिले, असे सांगत पॉवर गर्ल अमृता भगतने शेलू ते रोमानियाचा प्रवास उलगडला. 

कर्जत तालुक्यातील शेलू या गावातील अमृत भगत हिने रोमानिया देशात झालेल्या आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावीत रौप्यपदकाला गवसणी घातली. अमृता हिने ४७ किलो इक्वीप गटात १२० किलो वजन उचलून इतिहास केला. ४० देशांतील खेळाडू स्पर्धेत सहभागी होते. 

नेरळ ममदापूर येथील मातोश्री सुमती चिंतामणी टिपणीस महाविद्यालयात अमृताचे शिक्षण झाले. तिला लहानपणापासून क्रीडा क्षेत्राचे आकर्षण होते. १० वी पूर्ण केल्यावर अमृताने क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे सांगितले; मात्र तिला विरोध झाला. ती निराश झाली. मात्र तिच्या वडीलांनी तिच्या पंखांत बळ भरले आणि अमृताने वडलांचा विश्वास सार्थ ठरविला.

लय भारी वाटतं...मी जेव्हा रोमानियावरून परत आले तेव्हा माझ्या गावात माझं धडाक्यात स्वागत झालं. अनेकांनी माझा सत्कार केला. सेलिब्रिटी असल्यासारखं सगळे माझ्यासोबत सेल्फी, फोटो काढतात... लय भारी वाटते, असे अमृताने सांगितले.

...तर मी पॉवर लिफ्टिंगमध्ये नसतेमी रग्बीमध्ये ऑल इंडिया ब्रॉँझ मेडल मिळवलं आहे. खरंतर माझी सुरुवात ही कबड्डी, खो-खो, रग्बी अशी झाली होती; मात्र प्री ऑलिम्पिकमध्ये माझ्या पायाला दुखापत झाली. ज्यामुळे खेलो इंडियामध्ये माझी निवड हाेऊ शकली नाही. त्यामुळे मी पॉवर लिफ्टिंगकडे वळाले. जर तेव्हा माझ्या पायाला दुखापत झाली नसती तर मी आज पॉवर लिफ्टर खेळाडू नसते. अमृता ही कबड्डीत तरबेज होती. रग्बीतही तिचे प्रावीण्य आहे. तिने पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सहभाग घेतला आणि त्यात यश मिळवीत गेली. अमृताच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर तिची निवड जागतिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी करण्यात आली होती. २१ ऑगस्ट रोजी ती रोमानियासाठी रवाना झाली होती.