शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

योगसाधना ही भारतीय प्राचीन विद्या

By admin | Updated: June 22, 2016 02:11 IST

प्राचीन काळापासून साधू-संत हे योग करीत असून योगसाधना ही आपणास त्यांच्याकडून मिळाली आहे. योग ही भारतीय प्राचीन विद्या असून आजच्या धकाधकीच्या जीवनात याचा वापर करणे खूप आवश्यक आहे

मुरुड/ नांदगाव / आगरदांडा : प्राचीन काळापासून साधू-संत हे योग करीत असून योगसाधना ही आपणास त्यांच्याकडून मिळाली आहे. योग ही भारतीय प्राचीन विद्या असून आजच्या धकाधकीच्या जीवनात याचा वापर करणे खूप आवश्यक आहे. योग विद्येचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर याला मान्यता मिळावी यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न के ले. आंतरराष्ट्रीय महासंघाने याला मान्यता दिली असून २१ जून या दिनी व्दितीय योग दिन साजरा करताना आपणास आनंद होत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी मुरु ड येथे केले. सर एस. ए. हायस्कूल मुरु ड येथे हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत अांतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना गीते म्हणाले की, योगामुळे शरीराला उत्तम व्यायाम मिळत असून आपण प्रत्येकाने आरोग्य सुदृढ राहण्यासाठी नित्य नियमाने योग करावा, असे आवाहन त्यांनी केले. मंगळवारी पहाटे अांतरराष्ट्रीय योग दिन मुरु ड सर एस. ए. हायस्कूल येथील भव्य पटांगणावर साजरा करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा स्नेहा पाटील, जिल्हा प्रमुख प्रकाश देसाई आदी उपस्थित होते. (वार्ताहर)रोह्यात योग शिबिराला प्रतिसादरोहा : योग दिनानिमित्त आयोजित शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. भारतीय जनता पार्टी आणि रोहा अष्टमी नगरपालिकेतर्फे योग दिनाचे औचित्य साधून शहरातील दोन ठिकाणी योग शिबिराचे आयोजन केले होते. रोहेकरांनी मोठ्या संख्येने या शिबिरांचा लाभ घेतला. धकाधकीच्या आणि स्पर्धेच्या युगात शारीरिक व मानसिक स्वास्थ्य महत्वाचे आहे. असल्याचे नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी सांगितले.‘निरोगी आरोग्यासाठी योग उपयुक्त’१अलिबाग : निरोगी आरोग्यासाठी योग उपयुक्त असून त्यामुळे ताणतणाव दूर होऊन मानसिक संतुलन कायम राखण्यास मदत होते. त्यासाठी सर्वांनी नियमित योगासने करावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी केले. संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. त्यानिमित्त मंगळवारी दुसरा आंतरराष्ट्रीय योग दिन जिल्ह्यात योग प्रशिक्षण प्रात्यक्षिक घेऊन साजरा करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.२जिल्हा प्रशासन, जिल्हा क्र ीडा संकुल समिती,पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरा आंतरराष्ट्रीय योग दिन, योग प्रात्यक्षिके कार्यक्र म जिल्हाक्र ीडा संकुल, नेहुली अलिबाग येथे आयोजित के ला होता. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे आदी उपस्थित होते. ३जिल्हा क्र ीडा अधिकारी माधव कसगावडे, चिटणीस जयराम देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. राजू पाटोदकर,माहिती अधिकारी विष्णू काकडे आदींनी या योग प्रात्यक्षिकात सहभाग घेतला. सुमारे एक तास योग प्रात्याक्षिकाचे धडे पतंजली योग समितीचे संजीव म्हात्रे यांनी दिले .जनता विद्यालयात योग दिन साजरारसायनी: जागतिक योग दिन जनता विद्यालय व ज्यु. कॉलेजमध्ये विविध योगासने करून साजरा करण्यात आला. प्रथम पर्यवेक्षक एस. एस. पवार, मार्गदर्शक शिक्षक देवाजी काळे यांनी भारतीय संस्कृतीमधील योगाचे शारीरिक व मानसिक ताण दूर करण्यात महत्त्व, जागतिक योग दिनाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांनी सकाळी ७.३० ते ९.१५ यावेळेत भारतीय बैठकीत बसून मार्गदर्शक शिक्षक देवाजी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांगासन, हलासन, वर्तुळासन, विपरितकरणी मुद्रासन, संतुलासन, चक्र ासन, पवनमुक्तासन, नटराजासन ही आसने केली. शिक्षकांनीही आसने केली. यावेळी प्रभारी मुख्याध्यापक डी.सी. सुपेकर, पर्यवेक्षक एस.एस. पवार, डी. सी. तायडे, बाबासाहेब फुंदे, डी.जी.वाघ, सी.के. ठाकरे आणि शिक्षकांनी योगासने घेण्यात सहकार्य केले.योगासनाचे महत्त्वकार्लेखिंड : आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून २१ जून हा दिवस सर्वत्र साजरा करण्यात आला. या योगदिनामध्ये को. ए. सो. लिटील एंजल्स स्कूल, पेण या शाळेने सहभाग घेऊन शाळेतील इयत्ता दुसरी ते दहावीपर्यंतच्या अकराशे विद्यार्थी आणि सर्व सेवक वर्ग यांनी सहभाग घेतला. सुरुवातीला योगाचे महत्व शाळेच्या मुख्याध्यापिका मेरी जे. पिंक यांनी सांगितले. त्यानंतर शाळेतील शिक्षिका दर्शना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्लोक योगासनाचे प्रकार व शेवटी प्राणायाम घेण्यात आले. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना योगाचे धडेम्हसळा : जगभरात योग दिन साजरा होत असताना म्हसळा येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्या वतीने विद्या संकुलात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील योग शिक्षक डी. आर. सूर्यवंशी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्व सांगताना पतंजली योग मुनी यांच्या अष्टांग योगाचे महत्व विषद केले. आर. के. पाटील यांनी योगाचे महत्व विशद करताना दररोज योग करावा हा कानमंत्र दिला.तळा येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरातळा : गोपीनाथ महादेव वेदक प्रतिष्ठानच्या जी. एम. वेदक कॉलेज आॅफ सायन्स तळा येथे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साही वातावरणात पार पडला. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्राचार्य डॉ. एन. ए. डेग्वेकर, डॉ. व्ही. एस. रायकर, डॉ. एस. व्ही. जामदार आदींसह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी - विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला होता. चार लाख विद्यार्थ्यांनी घेतला लाभअलिबाग : रायगड जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार शाळांमध्ये जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. चार लाख विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी मुरु ड येथील शाळेतील विद्यार्थ्यांसह योग दिन साजरा केला. जिल्हा क्र ीडा संकुलातही जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी योगाचे धडे गिरवले. को.ए.सो.च्या चंंद्रकांत हरी केळुस्कर वैद्यकीय महाविद्यालय, जे.एस.एम. महाविद्यालयातही योग दिन साजरा करण्यात आला. सकाळी सात वाजता योगसाधनेला सुरु वात झाली. पतंजली योग समितीच्या माध्यमातून योग प्रात्यक्षिकांचे विविध ठिकाणी आयोजन करण्यात आले होते. याचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला. रेवदंडा: मुरुड-जंजिरा तालुक्यातील तळेखारमधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत जागतिक योग दिन साजरा झाला. शाळेतील योग शिक्षिका वंदना गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून योगासनाची विविध आसने करून घेतली व आसनांचे फायदे सांगितले. याप्रसंगी सरपंच धर्मा पाटील, उपसरपंच धर्मा ठाकूर, पालक, शिक्षक प्रकाश पाटील, अमृत म्हात्रे, जीवन तेलंगे, अपेक्षा म्हात्रे उपस्थित होते.