शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय समीकरणे बदलवणारे वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 00:16 IST

राष्ट्रवादीला खिंडार; नाईक परिवारालाही धक्का; चारही मतदार संघांवर भाजपचे वर्चस्व

नवी मुंबई : पनवेल, उरणसह नवी मुंबईमध्ये २०१९ हे वर्ष राजकीय समिकरण बदलवणारे ठरले. नाईक परिवाराने भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीला खिंडार पडले. विधानसभा निवडणुकीमध्ये नाट्यमय घडामोडीनंतर संदीप नाईक यांना उमेदवारीपासून वंचीत रहावे लागल्यामुळे नाईक परिवारासही धक्का बसला. भाजपसाठी हे वर्ष दिलासादायक ठरले असून चारही मतदार संघावर वर्चस्व मिळविण्यात पक्षाला यश आले आहे.नवी मुंबईमधील राजकारणाला मावळत्या वर्षामध्ये धक्कादायक कलाटणी मिळाली. लोकसभा निवडणुकीमध्ये ऐरोली व बेलापूर मतदार संघामध्ये शिवसेना उमेदवार राजन विचारे यांना प्रचंड मताधिक्य मिळाल्याने राष्ट्रवादीच्या गोटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली. राष्ट्रवादीमधील अनेक नगरसेवक शिवसेना व भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर सर्वप्रथम ऐरोलीचे आमदार संदीप नाईक व नंतर माजी मंत्री गणेश नाईक, संजीव नाईक व पक्षाच्या ४८ नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये खिंडार पडले. नाईकांच्या भाजप प्रवेशामुळे बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचे उमेदवारी धोक्यात आल्याचे बोलण्यात येत होते. परंतु शेवटच्या क्षणी पक्षाने म्हात्रे यांच्यावरच विश्वास दाखविला व गणेश नाईक यांची उमदेवारी कापली. नाईक समर्थकांसाठी हा निर्णय धक्कादायक होता. अखेर शेवटच्या क्षणी संदीप नाईक यांनी ऐरोली मतदार संघाचा त्याग करून तेथून गणेश नाईक यांना उमेदवारी देण्यात आली. तिसऱ्यांदा निवडून येण्याचे संदीप नाईक यांचे स्वप्न अपूर्णच राहिले. युतीमुळे शिवसेनेला एकही मतदार संघामध्ये उमेदवारी मिळाली नसल्यामुळे पक्षाच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची निराशा झाली. विधानसभेसाठी राष्ट्रवादीला उमेदवार शोधण्यासाठी धावपळ करावी लागली.लोकसभा निवडणुकीमध्ये पनवेल व उरण विधानसभा मतदार संघातून शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांना मोठे मताधिक्य मिळाले. यामुळे पवार कुटूंबियांच्या तिसºया पिढीतील पार्थ पवार यांना मावळ मतदार संघातून पराभवास सामोरे जावे लागले. विधानसभा निवडणुकीमध्येही पनवेलमधून भाजपच्या प्रशांत ठाकूर यांनी हॅट्रीक केली. युतीमध्ये उरण मतदार संघ शिवसेनेसाठी सोडण्यात आला होता. परंतु तेथे भाजपचे महेश बालदी यांनी बंडखोरी केली. त्यांच्या बंडखोरीला पक्षाने अप्रत्यक्षपणे पाठिंबा देवून निवडूणही आणले. शिवसेना उमेदवारास पराभवास सामोरे जावे लागले.पनवेल व उरण हा कित्येक दशके शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता. परंतु विधानसभा निवडणुकीमध्येही दोन्ही मतदार संघामध्ये शेकापला पराभवास सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे दहा वर्षापुर्वी नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरातमध्ये भाजपचे अस्तीत्वही नव्हते. परंतु २०१९ मध्ये चारही मतदार संघावर भाजपने एकहाती वर्चस्व प्राप्त केले आहे.महापालिकेची समीकरणे बदललीनवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेपासून भारतीय जनता पक्षाला समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. २००५ व २०१० च्या निवडणुकीमध्ये फक्त १ नगसेवक निवडून आला होता. २०१५ च्या निवडणुकीमध्ये फक्त सहा नगरसेवक निवडून आले होते. परंतु २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या ४८ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे महापालिकेवर वर्चस्व निर्माण झाले असून २०२० मध्ये होणाºया निवडणुकीची सर्व समिकरणेच बदलली आहे.शिवसेना पदाधिकाऱ्यांची निराशालोकसभा निवडणुकीमधील यशानंतर शिवसेना पदाधिकाºयांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. विधानसभेसाठी बेलापूर मतदार संघामधून विजय नाहटा यांनी तयारी सुरू केली होती. ऐरोलीमधून विजय चोगुले यांच्यासह एम के मढवी यांनीही निवडणूक लढण्याची तयारी केली होती. परंतु युतीमध्ये दोन्ही मतदार संघ भाजपच्या वाट्याला गेल्यामुळे शिवसैनीकांची व पक्षाच्या नेत्यांचीही निराशा झाली.वर्षभर फुटीची चर्चानवी मुंबईमध्ये सर्वच राजकिय पक्षामध्ये वर्षभर फुटीची चर्चा सुरू होती. काँगे्रसचे माजी जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत, विजय वाळूंज यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीमधील तब्बल ४८ नगरसेवकांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमधील काही नगरसेवक महापालिका निवडणुकीपुर्वी फुटून शिवसेनेत येण्याची शक्यता वर्तविली जात असून संपूर्ण वर्ष फोडाफोडीच्या राजकारणाने गाजल्याचे चित्र पहावयास मिळाले.

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस