शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वाशी खाडीवर तिसऱ्या पुलाचे काम; मंत्री दादाजी भुसे यांनी काढला २०२४ चा मुहूर्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 12:01 IST

सध्यातरी वाहतूककोंडीतून मुंबईकरांची सुटका नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : सायन - पनवेल महामार्गावरील वाशी खाडीवर तिसरा पूल उभारण्यात येत आहे.  या पुलाची एक मार्गिका मे २०२४ पर्यंत पूर्ण होईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री (एमएसआरडीसी) दादाजी भुसे यांनी पाहणी केल्यानंतर सांगितले. त्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सध्या तरी सुटका होणार नाही, असेच दिसून येत आहे. राजधानी मुंबईला नवी मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्राशी जोडणाऱ्या वाशी खाडीवरील तिसऱ्या पुलाची गुरुवारी सकाळी मंत्री भुसे यांनी पाहणी केली.

दोन्ही बाजूंच्या पुलांचे काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत ऑगस्ट २०२४ असून, त्यातील एका बाजूकडील ३ लेनचा पूल मे २०२४ पर्यंत तर संपूर्ण पूल सप्टेंबर २०२४ अखेरीस पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 

७७५ कोटींहून अधिक खर्च

मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या या बहुचर्चित तिसऱ्या पुलाच्या निर्मितीसाठी सुरुवातीला कांदळवनाचा अडथळा निर्माण झाला होता; परंतु सर्व अडथळे पार झाल्यानंतर रस्ते विकास महामंडळाने एल ॲण्ड टी कंपनीला कार्यादेश दिले आहेत. त्यानुसार वेगाने काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे. या कामावर ७७५ कोटींहून अधिक खर्च करण्यात येत आहे.

टोलनाका परिसरात वाहतूककोंडी

नवी मुंबई आणि मुंबईला जोडणारा पहिला खाडी पूल १९७१, तर दुसरा खाडी पूल १९९५ मध्ये सुरू झाला आहे. मधल्या काळात शीव-पनवेल महामार्गावरील वाहतुकीत मोठी वाढ झाली. यामुळे दोन्ही बाजूंच्या टोलनाक्यांच्या परिसरात दररोज वाहतूक कोंडी होत आहे. यामुळे यातून सुटका करण्यासाठी या तिसऱ्या पुलाचे बांधकाम सुरू आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई