शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अटल सेतूवर महिलेचा जीव देण्याचा प्रयत्न; टॅक्सी चालक अन् पोलिसांच्या धाडसाने वाचले प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 22:48 IST

नवी मुंबईत अटल सेतूवर एका महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आलं आहे.

नवी मुंबई :  अटल सेतू पुलावरुन ५६ वर्षीय महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. पुलाच्या सुरक्षा कठड्याच्या पलिकडे ही महिला बसलेली होती. तिने खाडीत उडी मारली असता कार चालकाने तिचा हात पकडून ठेवला असता तीन वाहतूक पोलिसांनी कठड्यावर चढून तिचे प्राण वाचवले.

शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा हा प्रकार घडला. पुलावर धोकादायक ठिकाणी एक महिला जावून बसली असल्याची माहिती न्हावा शेवा वाहतूक पोलिसांना मिळाली होती. त्याचवेळी पुलावर वाहतूक शाखेचे ललित शिरसाठ, किरण म्हात्रे, यश सोनवणे हे व्हॅनमधून गस्त घालत होते. ते पुलावर कार उभी असलेल्या ठिकाणी गेले असता, धोकादायक ठिकाणी बसलेल्या महिलेने पुलावरून पाण्यात उडी मारली. त्यावेळी कारलगत उभ्या असलेल्या चालकाने धाडसाने त्या महिलेचा हात पकडून ठेवला. यामुळे महिला लटकत असतानाच तिनही वाहतूक पोलिसांनी सुरक्षा कठड्यावर चढून त्या महिलेला सुरक्षित बाहेर काढले. कार चालक व वाहतूक पोलिसांच्या धाडसामुळे या महिलेचे प्राण वाचू शकले आहेत. सदर महिला मुलुंड परिसरात राहणारी असून नैराशयात ती आत्महत्येच्या उद्देशाने त्याठिकाणी आली होती.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAccidentअपघात