शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

नद्यांच्या पात्रातील अतिक्रमण हटविणार

By admin | Updated: April 24, 2016 00:26 IST

पनवेल परिसरातून जजाणाऱ्या मुख्य नद्यांचे शुध्दीकरण आणि परिसराचे सुशोभिकरण करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय तालुका प्रशासनाने घेतला आहे. त्याअंतर्गत लवकरच नद्यांच्या

- प्रशांत शेडगे,  पनवेलपनवेल परिसरातून जजाणाऱ्या मुख्य नद्यांचे शुध्दीकरण आणि परिसराचे सुशोभिकरण करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय तालुका प्रशासनाने घेतला आहे. त्याअंतर्गत लवकरच नद्यांच्या पात्रातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येणार आहे. सर्व्हेक्षणानंतर विशेष अतिक्रमण मोहिम राबविण्यात येणार आहे. पनवेल परिसरातून गाढी, काळुंद्रे, कासाडी या महत्वाच्या नदया वाहतात. या नदया हंगामी स्वरूपाच्या आहेत. डोंगरातून या नदयांचा उगम होतो आण ित्या खाडीला जावून मिळतात. यापैकी गाढी नदी मुख्य नदी म्हणून ओळखली जाते. माथेरानच्या डोंगररांगातून ही नदी वाहत येते. गाढेश्वरपासून या नदीचे पात्र मोठे होत जात असून छोटे छोटे ओढे या नदीला येवून मिळतात.या नदीचे पात्र मोठे असले तरी त्यामध्ये खडक आहेत त्याचबरोबर आजूबाजूच्या गावातील लोकांनी नदीच्या काठेवर अतिक्र मण केले आहे. त्यामुळे २६ जुलै २00५ मध्ये नद्यांच्या पात्रातून पाणी बाहेर आल्याने पनवेल परिसरात महाप्रलय आला होता. विशेष म्हणजे यानंतरही अतिक्रमणे जैसे थे अवस्थेत आहेत. त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. सुकापुर, देवद, विचुंबे, आकुर्ली, नेरे या गावांच्या हद्दीतही नद्यांच्या पात्रात अतिक्रमण उभारली आहेत. त्यामुळे नदीतून वाहणाऱ्या पाण्याला अडथळा निर्माण होत. काळुंद्रे नदीची स्थिती फारशी चांगली नाही, अतिक्रमण काठावर आहेत. त्यामुळे नदीचे पात्र काही प्रमाणात अरूंद झाले आहे. . कासाडी नदी शिरवलीच्या डोंगरातून उगम पावून ती तळोजा एमआयडीसी परिसरातून खाडीला जावून मिळते. या नदीच्या पात्रालगत काही कारखाने तसेच इतरांनी अतिक्र मण केले आहे. त्यामुळे कासाडी नेमकी गटारगंगा आहे , नदी का नाला असा प्रश्न उपस्थित होत आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी पुढाकार घेवून गंगा नदीच्या धर्तीवर पनवेलच्या मुख्य नदयाचे जलशुध्दीकर करण्याचा निर्णय घेतला. या संकल्पनेला तालुका प्रशासनाने चांगले बळ दिले असून ८ एप्रील रोजी गाढी नदीची परिक्र मा करून या अभियानाला सुरूवात करण्यात आली.दोन दिवसापुर्वी या संदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी उगमापासून ते मुखापर्यंत सर्ऱ्हेक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये अनिधकृत बांधकाम किती आहेत याबाबत माहिती घेण्यात येणार आहे.त्यानंतर संबधीत अतिक्र मणावर त्वरीत कारवाई करून नदीचे पात्र तसेच आजूबाजूचा परिसर अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश आमदार प्रशांत ठाकूर आणि तहसिलदार दिपक आकडे यांनी दिले आहेत. ही जबाबदारी गटविकास अधिकारी आणि पनवेल नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. लवकरच बैठकमुख्य नदीचे शुध्दीकरण आण िसुशोभिकरण हे लोकसहभागातून करण्यात येणार आहे. याकरीता मोठया प्रमाणात निधीची गरज भासणार आहे. कंपन्याकडे सामाजिक उपक्र माकरीता निधी राखीव ठेवला जातो. त्याचा वापर या अभियानाकरीता करण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार पनवेल परिसरात कंपनी मालकांची लवकरच बैठक बोलाविण्यात येणार आहे.नद्या शुध्दीकरणआणि सुशोभिकरणाचा महत्वकांक्षी प्रकल्प आपण हाती घेतला आहे. सर्वात आगोदर नदयांचे पात्र आण िलगत असलेले अतिक्र मण हटविण्याचा आमचा मानस आहे. त्याकरीता संबधीत विभागांना सर्व्हेक्षण करण्याचे आदेश निर्गमीत करण्यात आले आहे. त्याचबरोबर बीडीओ आणि सीओ यांच्या नेतृत्वाखाली मोहीम राबवून अतिक्रमणे हटविण्यात येईल- दीपक आकडे, तहसीलदार, पनवेल