शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान बदलू देणार नाही, रामदास आठवलेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 03:36 IST

रिपब्लिकन पक्ष आहे, तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान बदलू देणार नाही व त्याकडे वाकड्या नजरेने कोणाला पाहताही येणार नाही, असा इशारा राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला अहो.

नवी मुंबई - रिपब्लिकन पक्ष आहे, तोपर्यंत बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान बदलू देणार नाही व त्याकडे वाकड्या नजरेने कोणाला पाहताही येणार नाही, असा इशारा राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला अहो. सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते वाशीत उपस्थित होते. सदर कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.पॅथर नामदेवराव गायकवाड चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘समाजरत्न’ व ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आले. या वेळी आठवले यांनी बाबासाहेबांच्या संविधानात बदल होऊ देणार नाही, अथवा त्याकडे कोणाला वाकड्या डोळ्यानेही पाहू देणार नाही, असा इशारा दिला. सदर कार्यक्रमाचे आयोजन विजय कांबळे, एल. आर. गायकवाड, नारायण मोरे, सचिन कटारे, भरत भालेराव, विशाल कांबळे तर आयोजन ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष गायकवाड, सुमित्रा गायकवाड व विठ्ठल गायकवाड यांनी केले होते. रिपब्लिकन ऐक्यासाठी पॅथरसारखी संघटना बरखास्त करावी लागली; पण आज एकत्र येण्याऐवजी अनेक जण नवनवीन गट काढत आहेत, असे गट काढण्यापेक्षा नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न व्हायला हवा, असेही आठवले म्हणाले.या प्रसंगी प्रा. सुषमा अंधारे, सुमंतराव गायकवाड, नगरसेवक जगदिश गायकवाड, जिल्हाध्यक्ष सिद्राम ओहोळ, चंद्रकांत जगताप, नागेश कांबळे, आप्पासाहेब शिवशरण, युवराज मोरे, टिळक जाधव, शीलाताई बोदडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई