शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दुर्घटना घडेपर्यंत कारवाई करण्यासाठी का थांबता? उच्च न्यायालयाचा प्रशासनाला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 09:43 IST

इतकी वर्षे बेकायदेशीर होर्डिंगकडे डोळेझाक करणाऱ्या सिडकोला उच्च न्यायालयाने सुनावले

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पनवेल येथील होर्डिंग उतरवण्याबाबत सिडको आता आग्रही आहे; परंतु गेली पाच-सहा वर्षे सिडकोने काय केले? त्यावेळी त्यांनी कारवाई का केली नाही? दुर्घटना घडेपर्यंत प्रशासन कारवाई करण्यास का थांबते? असे प्रश्न उपस्थित करीत उच्च न्यायालयाने इतकी वर्षे बेकायदेशीर होर्डिंगकडे डोळेझाक करणाऱ्या सिडकोला गुरुवारी सुनावले.

पनवेलमधील काही होर्डिंग बेकायदेशीर आहेत, असे म्हणत सिडकोने संबंधित ॲडव्हर्टायझिंग फर्मना ४८ तासांत होर्डिंग्स उतरवण्यासाठी नोटीस बजावली. या नोटीसला ॲडव्हर्टायझिंग फर्मनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकांवर न्या. नितीन बोरकर व न्या. सोमशेखर सुंदरेसन यांच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे सुनावणी सुरू होती.

होर्डिंग लावण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीकडून परवानगी घेतला असून, सिडकोला कारवाई करण्याचा काहीही अधिकार नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. आक्षेपाला सिडकोतर्फे ॲड. गणेश हेगडे यांनी आक्षेप घेतला. नवी मुंबई विमानतळ प्राधिकरण प्रभावित क्षेत्र (नैना) साठी सिडकोला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा देण्यात आला आहे. संबंधित होर्डिंग नैनाच्या क्षेत्रात असल्याने सिडकोला त्यावर कारवाई करण्याचा अधिकार आहे, असा युक्तिवाद हेगडे यांनी न्यायालयात केला.

सिडकोच्या कारभारावर नाराजी

  • मुंबईत रूफटॉप हॉटेलला आग लागल्यानंतर सर्व रूफटॉप हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली आणि आता घाटकोपर दुर्घटना घडल्यानंतर सर्व होर्डिंग्जवर कारवाई करण्यात येत आहे, असे म्हणत न्या. सुंदरेसन यांनी सिडकोच्या कारभारावर नाराजी दर्शविली.
  • हे अधिकार केव्हा देण्यात आले? अशी विचारणा न्यायालयाने केल्यावर हेगडे यांनी २०१३ मध्ये सिडकोला अधिकार देण्यात आल्याचे सांगितले.
  • पनवेल येथील संबंधित होर्डिंग बेकायदेशीर असल्याचा दावा करताना हेगडे यांनी म्हटले की, ‘डीसीपीआर’च्या नियमानुसार ही होर्डिंग निश्चित करण्यात आलेल्या आकारात नाहीत; तसेच हायवे लगत असूनही ॲडव्हर्टायझिंग कंपन्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे आम्ही तातडीने ही होर्डिंग हटवणार आहोत.
  • नवीन होर्डिंग लावण्यासाठी सिडकोकडे अर्ज करतील. या अर्जांवर सिडकोने कायद्यानुसार ४५ दिवसांत निर्णय घ्यावा, असे निर्देशित न्यायालयाने या याचिका निकाली काढल्या.
टॅग्स :panvelपनवेलcidcoसिडकोMumbai High Courtमुंबई हायकोर्ट