शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

डीसीपी, एसीपी, सीपी कोणीही असो...माझ्यासमोर यायची पोलिसांची ताकद नाही

By सूर्यकांत वाघमारे | Updated: September 3, 2023 20:13 IST

खंडणीखोर पत्रकारावर गुन्हा

नवी मुंबई :पत्रकार असल्याचे सांगून अवैध धंद्याची बातमी टाळण्यासाठी ५० हजार गुडलक व महिना २० हजाराची मागणी करणाऱ्यावर वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर यापूर्वी देखील फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे. डीसीपी, एसीपी, सीपी कोणीही असो, माझ्यासमोर यायची पोलिसांची ताकद नाही असे धमकावत पैसे मागितले जात होते. यासंबंधीची तक्रार प्राप्त होताच रविवारी त्याच्यावर कारवाई करण्यात आली. 

एकनाथ शिवराम अडसूळ (४७) असे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या कथित पत्रकाराचे नाव असून तो खारघरचा राहणारा आहे. वाशी येथील एका व्यक्तीला तो खंडणीसाठी धमकावत होता. सदर व्यक्ती घरात जुगाराचा अड्डा चालवत असल्याचा त्याचा आरोप होता. यामुळे त्याच्या विरोधात बातमी न छापण्यासाठी तसेच पोलिसांकडे तक्रार न करण्यासाठी तो गुडविल स्वरूपात ५० हजार तर महिना २० हजाराची मागणी करत होता. तडजोड करून गुडविल ३० हजार रुपये तर महिना १० हजार रुपये घेण्याचे त्याने मान्य केले. दरम्यान त्याचे संभाषण संबंधित व्यक्तीने रोकॉर्ड करून पोलिसांकडे देऊन त्याच्या विरोधात तक्रार केली होती. त्यानुसार रविवारी सापळा रचून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 

कारवाईनंतर खंडणी मागणाऱ्या एकनाथ अडसूळ याचे रेकॉर्डिंग समोर आले आहे. त्यामध्ये अडसूळ हा संबंधित व्यक्तीवर त्याची छाप पाडण्यासाठी आपला पेपर लय डेंजर आहे. माझ्यासमोर यायची कोणाची ताकद नाही. डीसीपी, एसीपी, सीपी कोणीही असो... असे वक्तव्य करत असल्याचे समोर आले आहे. शिवाय आपल्याला खंडणी दिल्यानंतर मांडवली झाली असं पोलिसांना सांगून पुन्हा धंदा सुरु करायचा असा सल्लाही देताना दिसून येत आहे. त्याद्वारे तक्रारदार याचा अवैध धंदा होता का ? याचीही चौकशी वाशी पोलिस करत आहेत. 

काही दिवसांपूर्वी कोपर खैरणेत बार चालकाकडे खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारावर कोपर खैरणे पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर वाशीत हा गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वी एपीएमसी परिसरात देखील तोतया पत्रकारांचा सुळसुळाट सुटला होता. तर नेरूळमध्ये स्पा चालकांकडे खंडणी उकळणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईJournalistपत्रकारCrime Newsगुन्हेगारी