शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

मनसेची मते कोणाला मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 02:01 IST

गटबाजीची डोकेदुखी । संजय निरुपम आणि मनसेत आहे विळ्या भोपळ्याचे नाते

गेली १० वर्षे १५८ जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदार संघ हा शिवसेनेकडे आहे. राज्याचे गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर हे या मतदार संघाचे २००९ पासून प्रतिनिधित्व करतात. विधानसभा असो की लोकसभा मतदारांनी शिवसेनेला साथ दिली आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून मोदी लाटेत विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांना ४२ हजार ६३२ ची आघाडी येथून मिळाली होती. महायुतीचे गजानन कीर्तिकर यांना ८५ हजार ३६२ तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे गुरुदास कामत यांना ४२ हजार ७३० इतकी मते मिळाली होती. २००९च्या लोकसभा निवडणुकीत कामत यांनी यांनी कीर्तिकर यांचा पराभव केला होता. त्याची परतफेड २०१४च्या लोकसभा निवडणुकीत कीर्तिकर यांनी केली होती.

लोकसभा निवडणुकीनंतर २०१४च्या विधानसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणाला युती तुटली आणि शिवसेना व भाजपा एकमेकांच्या विरोधात लढले. या निवडणुकीत गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी भाजपाच्या उज्वला मोडक यांचा २८ हजार ९६२ मतांनी पराभव केला होता. २००९च्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र वायकर यांना ६४ हजार ३१८ तर काँग्रेसचे भाई जगताप यांना ५० हजार ५४३ तर मनसेच्या संजय चित्रे यांना २६ हजार ९३४ मते मिळाली होती. वायकर यांनी जगताप यांचा १३ हजार ७७५ मतांनी पराभव केला होता.२०१७च्या पालिका निवडणुकीत विधानसभेपाठोपाठ सेना व भाजपा युती तुटली होती. यावेळी पालिका निवडणुकीत शिवसेनेचे ४ भाजपा ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा १ असे एकूण ८ नगरसेवक जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदार संघातून निवडून आले. यामध्ये प्रभाग क्रमांक ५२ प्रीती सातम (भाजपा), प्रभाग क्रमांक ५३ रेखा रामवंशी (शिवसेना), प्रभाग क्रमांक ७२ पंकज यादव (भाजपा) यांचा अर्धा भाग या विभागात मोडतो. प्रभाग क्रमांक ७३ प्रवीण शिंदे (शिवसेना), प्रभाग क्रमांक ७४ उज्वला मोडक (भाजपा), प्रभाग क्रमांक ७७ अनंत नर(शिवसेना), प्रभाग क्रमांक ७८ सौफी जब्बार (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), प्रभाग क्रमांक ७९ सदानंद परब (शिवसेना) यांचा अर्धा विभाग या प्रभागात मोडतो. येथे कामगार वस्ती, गरीब, कष्टकरी आणि झोपडीत राहणारे नागरिक तर दुसरीकडे जोगेश्वरी लिंक रोडला मोठ्या प्रमाणात असलेल्या गनचुंबी इमारतीत राहणारे नागरिक असा हा मतदार संघ आहे. मतदार संघात गांधी नगर, प्रेमनगर, मेघवाडी, सर्वोदयनगर, कोकणनगर, पीएमजीपी, दुर्गानगर, सारीपूत, दत्तटेकडी, शिवटेकडी, रामवाडी हे भाग मोडतात.राजकीय घडामोडीच्हा मतदार संघ युतीचा बालेकिल्ला असल्याने काँग्रेसचा प्रभाव कमी जाणवतो.च्खासदार गजानन कीर्तिकर यांची लढत संजय निरुपम यांच्या बरोबर आहे. त्यामुळे येथे काँग्रेसची त्यांची खरी कसोटी आहे.च्विधानसभा मतदार संघात एकूण ८ प्रभाग येतात. यामध्ये शिवसेनेचे ४ नगरसेवक, भाजपाचे ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १ नगरसेवक आहे.च्कामत गटाबरोबर निरुपम यांचा संघर्ष आता तरी मिटून कामत गट निरुपम यांच्या निवडणुकीत सक्रिय होईल का हा प्रश्न आहे.दृष्टिक्षेपात राजकारण२०१४ च्या निवडणुकीत मनसेचे महेश मांजरेकर यांना येथून १६,४३१ इतकी मते मिळाली होती. यंदा मनसे निवडणुकीच्या रिंगणातच नाही. संजय निरुपम आणि मनसे यांच्यात विळ्या भोपळ्याचे नाते आहे. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत आघाडीत मनसेला सामावून घेण्यास निरुपम यांनी जोरदार विरोध केला होता. त्यामुळे मनसेची मते येथून कोणाला मिळणार हा प्रश्न आहे.आदिवासी पाड्यांना वीजच नसून त्यांना मूलभूत सुविधांचा अभाव आहे. मेट्रो कार शेडसाठी आरेमध्ये मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, एसआरएच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न असून ज्याठिकाणी एसआरए प्रकल्प झाले आहेत त्यांना ओसी नसल्याने पाणी व अन्य सुविधांचा अभाव आहे.या मतदार संघात मराठी १३५,५००, उत्तर भारतीय ५३,७००, अल्पसंख्यांक ३९,०००, गुजराथी/राजस्थानी २०,९००, दक्षिण भारतीय २०,२००, ख्रिश्चन ५,९०० आणि इतर १,५०० अशी एकूण मतदारांची संख्या २,७७,२६२ इतकी आहे.

टॅग्स :MNSमनसेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaj Thackerayराज ठाकरे