शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

कोण होणार सिडकोच्या घरांचे भाग्यवंत? ४ हजार घरांसाठी १५,८०० अर्ज, मंगळवारी सोडत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 11:14 IST

ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ४ नोव्हेंबरपर्यंत होती.  जवळपास सोळा हजार अर्ज दाखल झाले. अर्जाची छाननी प्रक्रिया झाली असून  वेळापत्रकानुसार २२ नोव्हेंबर रोजी या योजनेची संगणकीय सोडत काढली जाणार आहे.

नवी मुंबई : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सिडकोने जाहीर केलेल्या चार हजार घरांच्या योजनेला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. पंधरा हजारांपेक्षा अधिक ग्राहकांनी या योजनेअंतर्गत घरासाठी अर्ज केले आहेत. प्राप्त अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. २२ नोव्हेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या संगणकीय सोडतीच्या माध्यमातून घराचे ४ हजार १५८ लाभार्थी निश्चित होणार आहेत. सिडकोच्या नव्या गृहयोजनेची सर्वसामान्य ग्राहकांना नेहमीच प्रतीक्षा असते. त्यानुसार गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सिडकोने विविध ठिकाणच्या गृहप्रकल्पातील शिल्लक असलेल्या ४ हजार १५८ घरांची योजना जाहीर केली होती. 

ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत ४ नोव्हेंबरपर्यंत होती.  जवळपास सोळा हजार अर्ज दाखल झाले. अर्जाची छाननी प्रक्रिया झाली असून  वेळापत्रकानुसार २२ नोव्हेंबर रोजी या योजनेची संगणकीय सोडत काढली जाणार आहे.

नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोडमध्ये ही घरे आहेत. या घरांपैकी ४०४ घरे ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आहेत. तर उर्वरित ३ हजार ७५४ घरे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत. 

अनामत रकमेत वाढदरम्यान, गरजू ग्राहकांनाच या योजनेअंतर्गत घरासाठी अर्ज करता यावा, यादृष्टीने सिडकोने अनामत रक्कमेत वाढ केली आहे. त्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी ७५ हजार तर सर्वसामान्य घटकातील अर्जदारांसाठी दीड लाख रुपये अनामत रक्कम निश्चित केली आहे. याचा परिणाम म्हणून ज्यांना घर पाहिजे, अशाच ग्राहकांनी या योजनेअंतर्गत अर्ज केल्याचे सिडकोच्या संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबईHomeसुंदर गृहनियोजन