शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोतील सल्लागारांचे आश्रयदाते कोण?

By नारायण जाधव | Updated: June 3, 2024 10:01 IST

आताही नैनासाठी सल्लागार  नियुक्तीच्या निविदा ३ जानेवारी रोजी उघडल्या असता तीनपैकी एक निविदा तांत्रिक छाननीत बाद ठरली, तर मे. हितेन सेठी ॲण्ड असोसिएट्स आणि मे. आर्किटेक्ट हाफिज कॉन्ट्रॅक्टर हे पात्र ठरले.

नैना क्षेत्रासाठीचे अर्बन डिझायनिंग व मास्टर प्लानिंग तयार करण्यासाठी ४२५ कोटी रुपये देऊन नवा सल्लागार नेमण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. या तुघलकी निर्णयाबाबत येत्या पावसाळी अधिवेशनात वैभव नाईकांसह इतर आमदारांनी तारांकित प्रश्न केल्याने सिडको पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. यापूर्वी पीएम आवास योजनेतील ६५ हजार घरे विकण्यासाठी ७९९ कोटी रुपयांचा एजंट नियुक्त करण्याचा निर्णय सिडकोने राज्यकर्त्यांच्या आशीर्वादाने पचविलेला आहे. याबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित होऊनही यातील दोषींवर कारवाई न करता नगरविकास विभाग कोणाला पाठिशी घालत आहे?  यामागे कोण आहे, असा सवाल विचारला जात आहे. 

ज्या नैना क्षेत्रासाठी आता ४२५ कोटी खर्चून सल्लागार नेमला आहे, त्याचे २३ टीपींचे आराखडेही याच तज्ज्ञ वास्तुकारांनी तयार केले आहेत. यामुळे पुन्हा अर्बन डिझायनिंग व मास्टर प्लानिंगसाठी नव्या सल्लागाराची खरेच गरज आहे का, त्या २३ टीपी स्कीमचे काय झाले, सिडकोच्या नगररचना विभागास टाळे लावले काय? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक प्रकरणांत संबंधित प्रकल्पाचा खर्च संबंधित कंत्राटदारांच्या हितासाठी सल्लागारांनी वाढवून दिल्याचे सिडकोसह एमएमआरडीए आणि महापालिकांत उघड झाल्याचे आरोप विधिमंडळात करण्यात आले होते. त्यानंतर मोनोरेल, मेट्रो रेल्वे, सांताक्रुझ-चेंबूर-लिंक रोड, नवी मुंबई विमानतळासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नेमलेल्या लुईस बर्जर कंपनीवर आरोप झाल्यावर तिच्या चौकशीचे आदेश तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१५ मध्ये दिले होते. 

आताही नैनासाठी सल्लागार  नियुक्तीच्या निविदा ३ जानेवारी रोजी उघडल्या असता तीनपैकी एक निविदा तांत्रिक छाननीत बाद ठरली, तर मे. हितेन सेठी ॲण्ड असोसिएट्स आणि मे. आर्किटेक्ट हाफिज कॉन्ट्रॅक्टर हे पात्र ठरले. त्याच दिवशी निविदा मंजुरीच्या प्रस्तावावर नैनाचे कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, अतिरिक्त मुख्य अभियंता, मुख्य अभियंता, आर्थिक सल्लागार, लेखाधिकाऱ्यांसह सिडकोचे सहव्यवस्थापकीय व व्यवस्थापकीय संचालकांनी सह्या करून फाइल मंजूर करून १० जानेवारीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर केला.  

भूषण गगराणींनी थांबविले होते सल्लागारराज सिडकाेच्या सल्लागारांच्या या यादीत ॲसेनच्युर, क्रीसिल, धाराशॉ आणि ली असोसिएशनसारख्या कंपन्या असून त्यात सिडकोचेच निवृत्त अधिकारी आहेत. त्यांना सिडकोच लाखोंचे मानधन देते. यामुळे सिडकोतील अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळत नव्हती. हे लक्षात येताच सिडकोचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी हे सल्लागारराज थांबविले होते. मात्र, पीएम आवास योजनेच्या निमित्ताने नव्या अधिकाऱ्यांनी ७९९ कोटी खर्चून सल्लगारराजला ‘संजीव’नी दिली. आता आयएएस, आमदार, खासदारांच्या सोसायटीसाठीही सल्लागार नेमण्याचे घाटत आहे.

टॅग्स :cidcoसिडको