शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

कोविडकाळात खर्च केलेले पावणेदोनशे कोटी गेले कुठे?; RTI मधून सवाल

By नारायण जाधव | Updated: February 29, 2024 14:57 IST

तपशील देण्यास महापालिकेची टाळाटाळ : माहिती अधिकार कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे धाव

नारायण जाधव

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने मार्च २०२० ते २२ या कोविडकाळात विविध विभागांवर २३० कोटी रुपये खर्च केले आहेत. याबाबतचा तपशील माहिती अधिकारांतर्गत मागितला असता प्रशासनाने ५५ कोटी २९ लाख ७४ हजार ४२३ रुपयांचा तपशील दिला आहे. मात्र, उर्वरित १७४ कोटी ७० लाख २५ हजार ५६६ रुपयांच्या खर्चाचा देण्यास टाळाटाळ चालविली असल्याचा आरोप करून माहिती अधिकार कार्यकर्ते नरेंद्र मोहन हडकर यांनी थेट मुख्यमंत्र्याकडे धाव घेतली आहे.

महापालिकेने कोविडकाळात केलेला खर्च आणि दिलेली माहिती यात मोठी तफावत आहे. उर्वरित रक्कम नेमकी कोठे आणि कशी खर्च केली याची माहिती देण्यास आणि आपल्या अर्जावर अपिल घेण्यास महापालिका प्रशासन तयार नाही. हे का होत नाही, याची स्पष्टता देणे बंधनकारक आहे. परंतु, महापालिकेचे जनमाहिती अधिकारी हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना जुमानत नाहीत. अपिलीय अधिकारीसुद्धा एवढी मोठी चूक असूनही त्यांच्यावर कारवाई करीत नाही, हा प्रकार संशयास्पद असल्याचे हडकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

नवी मुंबई महापालिकेने मार्च २०२० ते २२ या कोविडकाळात आरोग्य विभाग, घनकचरा, आपत्ती विभाग, परिवहन, शहर अभियंता विविध विभागांवर किती खर्च केला याची माहिती आपण मागितली होती. त्यावर प्रशासनाने आरोग्य विभाग १२० कोटी, शहर अभियंता विभाग ६० कोटी, घनकचरा विभाग ५० कोटी, विद्युत विभाग १४ कोटी तीन लाख २९ हजार ३३८ रुपये, आपत्ती विभाग २२ लाख ११ हजार ५७६ आणि परिवहन विभाग सहा लाख ४८ हजार ८१६ असे एकूण २३० कोटी रुपये खर्च केले आहेत. परंतु, हिशेबाचा ताळमेळ लागत नसल्याने दोनदा माहितीचा तपशील मागितला असता तो देण्यात येत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- शहर अभियंता विभागाने ६० कोटी खर्च केला असला तरी माहिती १६ कोटी ३२ लाख ८७ हजार ६६१ रुपयांची दिली आहे. उर्वरित रकमेचे काय केले, याची माहिती दिलेली नाही.- आरोग्य विभागाने १२० कोटी रुपये खर्च केले असले तरी प्रत्यक्षात माहिती देताना २० कोटी २९ लाख ६२ हजार १९६ रुपयांचा तपशील दिला आहे. उर्वरित ८२ कोटी ९६ लाख दोन हजार १९३ रुपयांच्या खर्चाची माहिती दिलेली नाही.- विद्युत विभागाने १४ कोटी ३२ लाख २९ हजार ३३८ रुपयांचे काम दोनच ठेकेदारांना दिले असून, या सारे संशयास्पद आहे. येथील विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांचे लाड कशासाठी चालविले आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

दरम्यान, आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नरेंद्र हडकर यांनी नेमकी कोणती माहिती मागितली, याची चौकशी करण्यात येईल, असे सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताChief Ministerमुख्यमंत्री