शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

इमिग्रेशनसाठी पोलिसांचे बळ कधी मिळणार? नवी मुंबई विमानतळाचे आज उद्घाटन पण...

By सूर्यकांत वाघमारे | Updated: October 8, 2025 09:30 IST

मुंबईला पर्यायी नवी मुंबईत उभारलेल्या नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाचे बुधवारी उद्घाटन होत आहे.

- सूर्यकांत वाघमारेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : उद्घाटनाच्या टप्प्यावर असलेल्या नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर इमिग्रेशनसाठी अद्याप पोलिसांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. डिसेंबरमध्ये पहिले प्रवासी विमान उडण्याची शक्यता असून त्यासाठी २८५ पोलिसांची पदनिर्मिती केली आहे. त्यानुसार गत महिन्यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या झालेल्या बदल्यांमध्ये विमानतळावर इमिग्रेशनसाठी पोलिस दिले होते. मात्र, त्या बदली आदेशांना स्थगिती मिळाल्याने अद्याप नव्याने पोलिसांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. 

मुंबईला पर्यायी नवी मुंबईत उभारलेल्या नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाचे बुधवारी उद्घाटन होत आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये प्रत्यक्षात विमानतळावरून प्रवासी उड्डाणे नियोजित आहेत. त्यासाठी आवश्यक इमिग्रेशन प्रक्रिया हाताळणीकरिता नवी मुंबई पोलिसांची ताकद लावली जाणार आहे. 

का उशीर झाला नियुक्तीला?नवी मुंबई पोलिस दलातून हे संख्याबळ विमानतळासाठी देणे शक्य नसल्याने नवी मुंबई पोलिसांनी शासनाकडे पदनिर्मितीची मागणी करून आवश्यक अधिकारी व कर्मचाऱ्यांची मागणी केली होती.त्यानुसार गत महिन्यात निघालेल्या बदली आदेशात विमानतळासाठी अधिकारी व कर्मचारी पुरवले होते. डिसेंबरपूर्वी त्यांचे इमिग्रेशनच्या कामकाजाचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांना सज्ज करणे अपेक्षित होते. मात्र, त्या बदली आदेशांना स्थगिती मिळाल्याने अद्यापपर्यंत नवे बदली आदेश निघालेले नाहीत. यामुळे नवी मुंबई पोलिसांकडे विमानतळावर इमिग्रेशन प्रक्रिया हाताळणीसाठी अद्याप पुरेसे मनुष्यबळ पुरवण्यात आलेले नाही. त्यामुळे पोलिस महासंचालक कार्यालयातून वेळेत नवे बदली आदेश न निघाल्यास त्याचा परिणाम विमानांच्या निश्चित उड्डाण कालावधीवरदेखील होऊ शकतो.

पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक निरीक्षक, हेड कॉन्स्टेबल व कॉन्स्टेबल दर्जाचे कर्मचारी सामील.

English
हिंदी सारांश
Web Title : Navi Mumbai Airport Inaugurated, But Immigration Police Force Deployment Delayed

Web Summary : Navi Mumbai International Airport's inauguration proceeds, but immigration police deployment faces delays. Despite sanctioned positions and initial transfers, stalled orders hinder staffing. This shortage could impact scheduled flight operations.
टॅग्स :Airportविमानतळ