शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

उरणसह नवी मुंबईच्या सुरक्षेचे काय..?

By नारायण जाधव | Updated: May 12, 2025 03:07 IST

भारत-पाकिस्तानमधील  तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात माॅक ड्रिल घेण्यात आले.

नारायण जाधव, उपवृत्तसंपादक

भारत-पाकिस्तानमधील  तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात माॅक ड्रिल घेण्यात आले. यात राज्यातील अतिसंवेदनशील श्रेणी १ चे ठिकाण म्हणून उरण परिसराचा समावेश केला होता. कारण, उरणमध्ये केंद्र, राज्य आणि खासगी आणि नौदलाचे मोठे प्रकल्प आहेत. अटल सेतूनंतर नवी मुंबई विमानतळ लवकरच सुरू होणार आहे. २६/११ नंतर देशात राष्ट्रीय सुरक्षिततेच्या बाबतीत जरा काही झाले, तर उरण परिसरात सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या जातात; परंतु कायमस्वरूपी तोडगा कोणी शोधत नाही.  

उरणचा समुद्रकिनारा दक्षिण मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे. उरणचा समुद्रकिनारा खोल असल्याने ८० च्या दशकात येथे देशातील सर्वांत मोठ्या  जवाहरलाल नेहरू बंदराची पायाभरणी केली. आज त्याचा मोठा विस्तार झाला आहे. येथेच ‘ओएनजीसी’चा सर्वांत मोठा प्रकल्प आहे. येथे जमीन आणि समुद्राखालून ऑइल आणि रसायनांच्या पाइपलाइन गेल्या आहेत. याच परिसरात बुचर आयलँडसह जगप्रसिद्ध एलिफंटाबेटावर ‘युनेस्को’चे वारसास्थळ असलेल्या घारापुरी लेणी आहेत. तेथे पर्यटकांचा ओघ असताे. मात्र, दोन पोलिस शिपाई वगळता ठोस बंदोबस्त आजही नेमलेला नाही.

नौदलाचा आयएनएस आंग्रे हा तळ उरणमध्येच आहे. नौदलाची जहाजे, पाणबुड्यांचा  शस्त्रसाठा येथेच ठेवला जातो.  २६/११ च्या हल्ल्यानंतर नौदलाने मच्छीमार नौकांचे अवागमन असलेल्या राज्यांतील ५९१ लँडिंग पॉइंट्सची तपासणी केली होती. त्यात ९१ पॉइंट्स अतिरेकी हल्ल्यांच्या दृष्टीने अतिसंवेदनशील आढळले होते. या सर्व ठिकाणी कडक सुरक्षा तैनात करणे आवश्यक असल्याचे निरीक्षण नौदलाने नोंदविले होते.

‘जेएनपीए’च्या ५०० हेक्टर केमिकल झोनमध्ये मोठमोठे अतिसंवेदनशील प्रकल्प आहेत. यात इंडियन ऑइल,  रिलायन्स, आयएमसी, गणेश बॅन्जो प्लास्ट, सूरज ॲग्रो, बीपीसीएल लिक्विड कार्गो जेट्टीचा समावेश आहे. उरणपासून ८ ते १० किमी सागरी अंतरावर भाऊचा धक्का, ११ किमीवर गेट वे ऑफ इंडिया, ६ किमी सागरी अंतरावर अतिसंवेदनशील बुचर आयलँड आहे. येथूनच तेलवाहू जहाजांची वाहतूक केली जाते. सीलिंक, वाशी खाडी पूल येथून जवळच आहे. रासायनिक व संवेदनशील प्रकल्पात दुर्घटना घडल्यास ३० किमी परिघातील परिसराला धोका संभवतो. यावरून हा परिसर अतिसंवेदनशील असल्याचे अधोरेखीत होते. मात्र, सागरी गस्तीसाठी नवी मुंबईपोलिसांकडे अवघ्या तीन  साध्या स्पीड बोटी आहेत. कोस्ट गार्ड आणि नौदल गस्त घालत असले, तरी ती खोल समुद्रात जास्त असते. मग, किनाऱ्याच्या सुरक्षेचे काय, हा प्रश्न आहे.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईuran-acउरणPoliceपोलिस