शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
3
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
4
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
5
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
6
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
7
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
8
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
9
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
10
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
11
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
12
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
13
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
14
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
15
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
16
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
17
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
18
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
19
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

स्वागत कमानी जैसे थे!

By admin | Updated: September 24, 2015 00:41 IST

रोडवर अनधिकृतपणे बॅनर व स्वागत कमानी बांधणाऱ्या राजकीय पक्षांच्या मंडळांना महापालिका प्रशासनाने अभय दिले आहे.

नवी मुंबई : रोडवर अनधिकृतपणे बॅनर व स्वागत कमानी बांधणाऱ्या राजकीय पक्षांच्या मंडळांना महापालिका प्रशासनाने अभय दिले आहे. रोडवर खड्डे काढून व व्यावसायिक जाहिराती लावल्यानंतरही संबंधितांवर काहीच कारवाई केलेली नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत असतानाही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे. गणेशोत्सव मंडळांना रोडवर परवानगी देण्यात येवू नये. रोडवर खड्डे काढून स्वागत कमानी उभारू नये असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहे. याशिवाय अनधिकृतपणे होर्डिंग लावणाऱ्यांवरही कारवाई करण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. परंतु शहरात राजकीय वरदहस्त असणाऱ्या मंडळांनी सर्व नियम धाब्यावर बसवून शहरात २ हजारपेक्षा जास्त अनधिकृत होर्डिंग लावले आहेत. जवळपास १ हजार स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. वाशीमध्ये राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष व इतर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी कमानींचा विक्रमच केला आहे. महामार्गापासून शिवाजी चौकापर्यंत प्रत्येक दहा फुटावर कमानी लावण्यात आल्या आहेत. सेक्टर १७ मधील अंतर्गत रोडवरही पूर्णपणे कमानी लावल्या आहेत. या कमानी गणेशभक्तांच्या स्वागतासाठी नसून मंडळांना देणगी देणाऱ्यांच्या जाहिराती त्यावर लावण्यात आल्या आहेत. मंडळांनी लाखो रूपये कमावले असून त्यांच्या कमाईसाठी रोडवर खड्डे खणले आहेत. ऐरोली, कोपरखैरणे, नेरूळ, सीबीडी सर्व ठिकाणी अशीच स्थिती आहे. नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी यांच्या दबावामुळे प्रशासन त्यांच्यावर कारवाई करत नाही. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहरातील छोट्या मंडळांनी उभारलेल्या अनधिकृत कमानींना नोटिसा पाठविल्या आहेत. अनेकांवर कारवाई केली आहे. राजकीय वरदहस्त असणाऱ्यांना मात्र अभय दिले जात आहे. यामुळे शहरातील दक्ष नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पालिकेचे अधिकारी राजकारण्यांना घाबरत असून सामान्य नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. राजकारण्यांची मर्जी राखण्यासाठी रोडवर खड्डे खणल्यानंतरही संबंधितांवर काहीच कारवाई केली जात नाही. ज्यांच्यावर कारवाई झाली त्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)