नामदेव मोरे - नवी मुंबई
काटकसरीमध्ये प्रगतीचा मार्ग दडला असून देशाच्या हितासाठी प्रत्येकाने वीज, पाणी व इंधनाची बचत करणो आवश्यक आहे.
देशातील इतर शहरांच्या तुलनेमध्ये नवी मुंबईमध्ये समाधानकारक सार्वजनिक सुविधा उपलब्ध होत आहेत. दळणवळण, पाणी व विजेची टंचाई शहरात भासत नाही. परंतु या सुबत्तेमुळे नागरिकांमधील निष्काळजीपणा वाढत आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीची उधळण सुरू आहे. नवी मुंबई महापालिकेने मोरबे धरण विकत घेतल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. शहरातील 65 टक्के परिसरात चोवीस तास पाणीपुरवठा होत आहे. शहरवासी रोज जवळपास 425 एमएलडी पाणी वापरत आहेत. मोठय़ा प्रमाणात पाण्याची उधळपट्टी सुरू आहे. उद्यानासाठीही पिण्याचा पाण्याचा वापर सुरू आहे.
पाण्याप्रमाणो मुंबई, ठाणो, नवी मुंबईमध्ये विजेची मोठय़ा प्रमाणात उधळपट्टी सुरू आहे. शहरातील बाजारपेठा, मॉल्स व इतर ठिकाणी आवश्यकतेपेक्षा जास्त वीज वापरली जात आहे. शासकीय व खाजगी कार्यालयांमध्येही गरज नसताना वातानुकूलित यंत्रणा, पंखे सुरूच ठेवले जात आहेत. हे थांबविण्यासाठी आवश्यक वीज वापरणो आवश्यक आहे वीज, पाणी व इंधनाच्या बचतीमध्ये देशाच्या प्रगतीचा मार्ग दडला आहे. जबाबदारी ओळखून नैसर्गिक साधनसंपत्तीचा आवश्यक तेवढाच वापर करणो आवश्यक आहे.
च्प्रत्येक नागरिकाने पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. वाहने धुण्यासाठी व कुंडीतील झाडांना पाणी घालताना पाइपचा वापर करू नये. प्रसाधनगृहामध्ये फ्लशचा वापर करू नये. व्यावसायिक व घरगुती वापरासाठी आवश्यक तेवढेच पाणी वापरणो आवश्यक आहे.
च्पाण्याची उधळपट्टी करताना कोणी आढळून आले तर संबंधितांवर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती नवी मुंबई पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे यांनी दिली.
च्विजेचा अत्यंत काटकसरीने वापर करणो आवश्यक आहे. शहरांमध्ये अनावश्यक कामांसाठी विजेचा वापर होत असतो. शासकीय व खाजगी कार्यालयांमध्ये वातानुकूलित यंत्रणा, पंख्यांचा वापर आवश्यक तेवढा करावा. दिवसा घर व कार्यालयांमध्ये जास्तीत जास्त नैसर्गिक प्रकाश येईल अशी रचना असावी.
च्विजेची उपकरणो कमीत कमी वापरावी. विजेची उधळपट्टी कोणालाच परवडणारी नसून प्रत्येक नागरिकाने स्वत:चे कर्तव्य समजून एक -एक युनिट वीज वाचविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता ए. एम. थोरात यांनी केले आहे.