शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

पनवेलमध्ये पाण्याची गळती सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 11:31 PM

पनवेलच्या काही भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : पनवेलच्या काही भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अनेक वसाहतींना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्याचवेळी एमजेपीच्या जलवाहिनीला गळती सुरूच असल्याचे दिसून आले आहे. एकूणच भीषण पाणीटंचाईत सुद्धा पाण्याचा अपव्यय सुरूच असल्याने पनवेलकरांनी संताप व्यक्त केला आहे.एमजेपीची भोकरपाडा ते कळंबोली दरम्यानची जलवाहिनी जुनी व जीर्ण झाली आहे. त्यामुळे या जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती लागते, तर काही ठिकाणी झोपडीधारक व काही व्यावसायिक जलवाहिनी फोडून पाण्याची चोरी करतात. विशेष म्हणजे जलवाहिनीला एकदा छिद्र पाडले की, त्यातून सतत पाणी वाहत असते. ती दुरुस्त करण्याबाबत संबंधित विभागाकडून कोणतीही तत्परता दाखविली जात नाही. याचा परिणाम म्हणून दरदिवशी हजारो लीटर पाणी वाया जात आहे. शहरात एकीकडे पाणीटंचाई असताना दुसरीकडे पाण्याचा वारेमाप अपव्यय होत असल्याचे चित्र पनवेलमध्ये पाहावयास मिळत आहे. जीर्ण व जुन्या झालेल्या एमजेपीची जलवाहिन्या बदलण्याबाबत मागील अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे. त्यासाठी अनेक बैठकाही झाल्या. मात्र कार्यवाही काहीच झाली नाही. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांची भेट घेवून जलवाहिनी बदलण्याची गरज का आहे, हे सुध्दा त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. याचा परिणाम म्हणून जुन्या जलवाहिन्या बदलण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. असे असले तरी सध्या ज्या ठिकाणी नियमित गळती होते त्या ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे रहिवाशांचे मत आहे. एकीकडे पाणीटंचाई आहे, तर दुसरीकडे पाण्याची गळती सुरू आहे. संबंधित प्रशासनाच्या गैरकारभाराचे हे प्रतीक असल्याची प्रतिक्रिया सह्याद्री सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष बबनराव पवार यांनी व्यक्त केली आहे.>जलवाहिनीला गळती लागलेली ठिकाणेखांदा वसाहत, आसुडगाव, कळंबोली द्रुत महामार्गाच्या पुलाखाली एमजेपीच्या जलवाहिनीला बारा महिने गळती लागलेली असते. आजमितीससुद्धा याच ठिकाणी मोठ्याप्रमाणात पाणी वाहून जात आहे. नवीन पनवेल आणि कळंबोलीत काही ठिकाणी पिण्याकरिता पाणी नाही. हंडाभर पाण्यासाठी कळंबोलीत वाद होत आहेत.वाय पॉइंट ते कळंबोली या दरम्यानची जलवाहिनी त्वरित बदलण्यात यावी अशी मागणी केली आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. लवकरच त्यावर कार्यवाही होईल, असा विश्वास वाटतो.- संतोष शेट्टी, नगरसेवक,पनवेल महापालिका