शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलकरांवर पाणी दरवाढीचे संकट, सिडकोने वाढविले दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 03:25 IST

पनवेल तालुक्यामधील खारघर, तळोजा, कळंबोली, नावडे, कामोठे, करंजाडे, नवीन पनवेल, काळुंद्रे व द्रोणागिरी नोडला सिडकोच्या माध्यमातून हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे.

नवी मुंबई : पाणी टंचाईमुळे त्रस्त असलेल्या पनवेलकरांवर आता पाणी दरवाढीचे संकट कोसळले आहे. सिडकोने फेब्रुवारी-मार्चच्या देयकापासून सुधारित दर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. घरगुती वापरासाठीच्या दरामध्येही वाढ केल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.पनवेल तालुक्यामधील खारघर, तळोजा, कळंबोली, नावडे, कामोठे, करंजाडे, नवीन पनवेल, काळुंद्रे व द्रोणागिरी नोडला सिडकोच्या माध्यमातून हेटवणे धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. शेजारील नवी मुंबई महानगरपालिकेमधील रहिवाशांना २४ तास पाणीपुरवठा होत असताना पनवेल परिसरामध्ये मात्र पिण्यासाठीही पुरेसे पाणी मिळत नाही. मार्चमध्येच तीव्र पाणी टंचाई जाणवू लागली आहे. नागरिकांना आवश्यक तेवढेही पाणी दिले जात नाही. यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड असंतोष आहे. पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यास अपयशी ठरलेल्या प्रशासनाने पाणी दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सिडको प्रशासनाने सिडकोच्या व्यापारी, सामाजिक व धर्मादाय संस्था तसेच निवासी वापराच्या नळ जोडण्यांकरिता व सिडकोच्या हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या गावांकरिता फेब्रुवारी-मार्चच्या देयकापासून वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारीत पाणी दरामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांना सर्वप्रथम पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होऊ लागली आहे.यापूर्वी व्यापारी वापरासाठी प्रतिघनमीटर ३५ रुपये दर आकारला जात होता. त्यामध्ये वाढ करून ४५ रुपये करण्यात आले आहेत. सामाजिक संस्थांचे दर १४ वरून १८ करण्यात आले आहेत. घरगुती वापराच्या दरामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. २० घनमीटरपर्यंत पाणी वापरल्यास पूर्वीच्या ४.७५ रुपयांऐवजी ६ रुपये दर आकारण्यात येणार आहे. ४२ घनमीटरच्या वर पाणी वापरल्यास पूर्वी ७ रुपये दर होता तो २० रुपये करण्यात आला आहे.

टॅग्स :panvelपनवेलWaterपाणी