शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
2
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
3
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
4
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
5
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
6
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
7
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
8
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
9
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
10
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
11
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
12
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
13
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
14
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
15
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
16
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
17
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
18
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
19
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
20
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!

नवी मुंबईकरांवर पाणीसंकट; मोरबेत चार महिने पुरेल इतकेच पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 23:23 IST

स्वत:च्या मालकीचे धरण असलेली नवी मुंबई ही राज्यातील दुसरी महापालिका आहे.

नवी मुंबई : शहराला २४ तास पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाण्याची पातळी खालावली आहे. सध्या धरणात चार महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मुंबई व अन्य बड्या शहरापाठोपाठ यावर्षी नवी मुंबईकरांवरही पाणीकपातीचे संकट घोंगावू लागले आहे, त्यामुळे पाण्याच्या स्वैरवापराला आळा घालण्याचे मोठे आवाहन महापालिका प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

स्वत:च्या मालकीचे धरण असलेली नवी मुंबई ही राज्यातील दुसरी महापालिका आहे. खालापूर तालुक्यातील स्व:मालकीच्या मोरबे धरणातून महापालिका शहरवासीयांना २४ तास पाणीपुरवठा करते. गेल्या वर्षी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस पडला. त्यामुळे धरण ओव्हरफ्लो झाल्याने ७०० दशलक्ष पाण्याचा विसर्ग करावा लागला होता. असे असतानाही यावर्षी धरणातील पाण्याची पातळी खालावल्याचे दिसून आले आहे. मोरबे धरणाची पातळी ८८ मीटर इतकी आहे, म्हणजेच ८८ मीटर पातळी गाठल्यानंतर धरणात १९०.८९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होतो. सध्या धरणात ९४.३७ दशलक्ष घनमीटर इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. हा जलसाठा साधारण १५ आॅगस्टपर्यंत पुरेल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मान्सूनला आणखी दीड ते दोन महिने उरले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी दहा टक्के पाऊस कमी पडेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुबलक पाणी वापरण्याची सवय लागलेल्या नवी मुंबईकरांना यावर्षी काही प्रमाणात काटकसर करावी लागणार आहे.महापालिका मोरबे धरणासह उपलब्ध विविध स्रोतांच्या माध्यमातून दिवसाला एकूण ३२७ एमएलडी इतका पाणीपुरवठा करते.सिडको नोड्सनाही पाणीपुरवठामोरबे धरणासह एमआयडीसी आणि सिडकोकडून महापालिकेच्या जलकुंभात दिवसाला ३२७ एमएलडी इतका पाणीसाठा होतो. यापैकी खारघर, कळंबोली व कामोठे या सिडको नोड्सना महापालिका पाणीपुरवठा करते. तर जलकुंभातील एकूण जलसाठ्यापैकी जवळपास २७० एमएलडी इतके पाणी नवी मुंबईतील विविध उपनगरांना पुरविले जाते.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाई