शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
3
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
4
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
6
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
7
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
9
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
10
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
11
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
12
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
13
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
14
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
15
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
16
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
17
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 
18
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
19
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
20
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी

खालापूरसाठी ‘जलयुक्त’ वरदान

By admin | Published: September 17, 2016 2:18 AM

महाराष्ट्राच्या विकासासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान ही महत्त्वाकांक्षी योजना आखली आणि तिचा शुभारंभ रायगड जिल्ह्यातून झाला.

जयंत धुळप,  अलिबागमहाराष्ट्राच्या विकासासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान ही महत्त्वाकांक्षी योजना आखली आणि तिचा शुभारंभ रायगड जिल्ह्यातून झाला. जिल्ह्यात या योजनेचे अत्यंत सकारात्मक असे परिणाम साध्य होताना दिसून येत आहेत. २०१९ पर्यंत महाराष्ट्र जलसमृध्द करण्याची ही महत्त्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आली. जलयुक्त शिवार अभियान संपूर्ण खालापूर तालुक्यास आता वरदान ठरले आहे. संपूर्ण कोकणात पावसाचे प्रमाण भरपूर असते. रायगड जिल्ह्यात साधारण५० हजार मि.मी. इतका पाऊस वर्षाला पडतो. पावसाळ््यात खळखळ वाहणाऱ्या नद्या आणि ओढे नजरेला सुखद वाटतात. मात्र हे वाहून जाणारे पाणी कोकणातील जमिनीतच मुरले तर जमिनीतील पाण्याची पातळी वाढू शकते म्हणूनच जलयुक्त शिवार अंतर्गत गेल्या दोन वर्षात रायगड जिल्ह्यामध्ये ९४५ कामे पूर्ण करण्यात आली.खालापूर तालुक्यात चावणी व नडोदा या ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कामे करण्यात आली. तर उंबरे, खानव, बोरगाव या गावातही योजनेंतर्गत कामे करण्यात येत आहेत. २०१५ च्या आराखड्यानुसार ५४ कामे प्रस्तावित होती. ही कामे ८१.४० हेक्टर क्षेत्रामध्ये राबविण्यात आली. सलग समतर चर, मातीचे बांध, सिमेंट नाले, शेततळे, जुन्या भातशेतीची दुरु स्ती, गाळ काढणे आदि कामांचा समावेश करु न योजनेला मूर्त स्वरु प देण्याचा प्रयत्न या भागात यशस्वी झाला. नडोदे परिसरात ६८.४८ हेक्टरमध्येही मातीचे बांध १२, सिमेंट नाला १, शेततळे ३, जुन्या भातशेतीची दुरु स्ती करण्यात आली असून सिमेंटचे बांध ३ ठिकाणी बंधारे तयार केले आहेत तर ६ बंधाऱ्यांतील गाळ काढण्यात आला आहे.खानव, उंबरे, बोरगाव खुर्द सोंडेवाडी या ३ गावांचा समावेश प्रस्तावित कामांमध्ये असून त्याचा आराखडा तयार झाला आहे. हा भाग काहीसा डोंगराळ असल्याने पाणीटंचाईवर मात करण्यासाठी याचा विचार करण्यात आला आहे. खानाव हे जवळपास १८०० लोकवस्ती असलेले गाव. तर बोरगाव खुर्द सोंडेवाडीची लोकसंख्या जवळपास १२०० आणि उंबरेची लोकसंख्या जवळपास १७०० आहे. त्यामुळे या भागात पाणीटंचाईला पर्याय म्हणून जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत या योजना राबविल्या जात आहेत. या ठिकाणी देखील सलग समतर चर, मातीचे बांध, सिमेंट नाले, शेततळे, जुन्या भातशेतीची दुरु स्ती, गाळ काढणे अशी कामे हाती घेतली जाणार आहेत. खानाव परिसरात एकूण ८१.५० हेक्टर, बोरगाव परिसरात ११५ हेक्टर भागात ही कामे केली जाणार आहेत.एकूणच या जलशिवार योजनेमुळे या भागात झालेल्या कामांमुळे पाणीसाठा साचून तो जमिनीत मुरविण्यामध्ये बरेचसे यश मिळाले आहे. येत्या काही वर्षात या अभियानांतर्गत कामे पूर्ण झाल्यावर भूगर्भात पाणी जिरवून व जमिनीची धूप थांबविण्यात आणखीन मोठे यश मिळवून येथील पाणीटंचाई कायमची दूर होऊन २०१९ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र पाणीटंचाईमुक्त करण्याच्या मोहिमेची सफलता होईल, असा विश्वास जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे.