शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील बाजार समित्यांत पुन्हा 'वाराई' राज

By नारायण जाधव | Updated: March 2, 2024 19:05 IST

नवी मुंबई : कृषिमाल घेऊन आलेला ट्रक बाजार समितीच्या गेटवर थांबवून ड्रायव्हरकडून माथाडींच्या नावाखाली वाराई/एन्ट्री टॅक्स वसूल करण्यास पुन्हा ...

नवी मुंबई: कृषिमाल घेऊन आलेला ट्रक बाजार समितीच्या गेटवर थांबवून ड्रायव्हरकडून माथाडींच्या नावाखाली वाराई/एन्ट्री टॅक्स वसूल करण्यास पुन्हा एकदा महायुती सरकारच्या सहकार व पणन विभागाने मोकळे रान करून दिले आहे. राज्यातील माथाडी कामगारांनी मुंबईच्या आझाद मैदानात बाबा आढाव यांच्या नेतृत्वात सुरू केलेल्या उपोषणात ज्या मागण्या केल्या होत्या, त्यात माथाडी व सुरक्षारक्षक कायदा सुधारणा विधेयक मागे घेण्यासह 'वाराई' पुन्हा सुरू करावी, या मागण्यांसह इतर आठ मागण्यांचा समावेश होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत माथाडींच्या बहुतेक मागण्या मान्य केल्या होत्या. त्यानुसार सहकार व पणन विभागाने आपले २०१६ मधील आदेश मागे घेऊन 'वाराई' पुन्हा सुरू करण्यास मान्यता दिली आहे. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या ६ सप्टेंबर २०१६ च्या आदेशानुसार बाजार समितीमध्ये ‘वाराई’ वसूल करणे हे अवैध असून, ती वसूल हाेणार नाही, याची दक्षता बाजार समिती प्रशासनाने घ्यावी. बाजार समित्यांच्या गेटवर ट्रक, टेम्पो थांबवून ड्रायव्हरकडून माथाडीच्या नावाखाली वाराई/एन्ट्री टॅक्स वसूल केला असल्यास ही बाब माथाडी मंडळासह पोलिसांच्या निदर्शनास आणावी, व्यापारी, आडते किंवा इतर अनुज्ञप्तीधारक बाजार घटकांकडून असे प्रकार होत असतील तर त्याबाबत तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित व्यापारी, आडत्यांविरुद्ध शासन निर्णयानुसार कारवाई करावी, असे आदेश पणन संचालकांनी दिले होते. याच आदेशांना आता स्थगिती दिली आहे.

काय म्हटले आहे नव्या आदेशातराज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील ‘वाराई’ या प्रचलित कार्यपद्धतीबाबत उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या ६ सप्टेंबर २०१६ या शासन निर्णयावर संबंधित प्रशासकीय विभागाचा अभिप्राय घेणे आवश्यक आहे. तसेच कामगार कायद्यामधील महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ व त्याखालील १९६७ नियमातील तरतुदी तसेच महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ, पुणे यांच्या २३ जानेवारी २०२४ रोजीच्या निवेदनामधील मुद्यांची सखोल तपासणी करणे आवश्यक आहे. परंतु, पणन संचालक, पुणे यांनी अशी मान्यता व अभिप्राय घेतलेले नाहीत. यामुळे त्याला पुढील आदेशापर्यंत त्यांच्या वाराई वसुलीस मनाई करणाऱ्या परिपत्रकाला स्थगिती देण्यात येत असल्याचेे सहकार विभागाने १ मार्च २०२४ रोजीच्या आदेशात म्हटले आहे.

मुंबई बाजार समितीत शिरल्या होत्या गुंड प्रवृत्ती'वाराई'च्या नावाखाली होणारी वसुली करताना कष्टकरी माथाडी कामगारांमध्ये काही गुंडप्रवृत्तीच्या लोकांनी प्रवेश केला होता. यातील अनेकजण मुंबईतील भायखळा परिसरातील संघटित टोळ्यांचे सदस्य असल्याचा संशय होता. यातून अनेकदा हाणामारी, कामगार, व्यापारी यांना धमकावण्याचे प्रकारही घडले होते. तसेच 'वाराई' वसूल करणे हे नियमबाह्य असल्याने त्यावर बंदी आणावी, अशी जुनी मागणी होती. त्यामुळे तिच्या वसुलीला स्थगिती दिली होती. परंतु, आता महायुती सरकारने ती पुन्हा सुरू केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई