शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बदूक ठेवून चालवली 'गोळी'
2
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाच म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
3
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
4
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
5
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
6
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
7
Chaturmas 2025: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
8
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
9
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
10
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
11
कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही; अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर भारताची स्पष्टोक्ती
12
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
13
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे (Watch Video)
14
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
15
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
16
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
17
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
18
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
19
Chaturmas 2025: फक्त २ मिनिटात म्हणून होणारे 'हे' स्तोत्र चातुर्मासात देईल बक्कळ लाभ!
20
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."

पनवेलमधील आदिवासीवाडी विजेच्या प्रतीक्षेत

By admin | Updated: December 28, 2016 03:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना डिजिटल इंडियाचे स्वप्न दाखवित आहे. त्यासाठी शहराबरोबरच ग्रामीण भागातील शाळा स्मार्ट करण्यात येत आहे. मात्र मुंबईपासून ४०-५० किमीवर

पनवेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना डिजिटल इंडियाचे स्वप्न दाखवित आहे. त्यासाठी शहराबरोबरच ग्रामीण भागातील शाळा स्मार्ट करण्यात येत आहे. मात्र मुंबईपासून ४०-५० किमीवर असलेल्या पनवेल तालुक्यातील खानाचा बंगला (निताळ - वावंजे) आदिवासी वाडी अद्याप अंधारमय आहे. पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योजिक वसाहतीत कल्याण तालुक्याच्या सरहद्दीजवळ वावंजे गाव आहे. या गावापासून एक - दीड किमी अंतरावर खानाचा बंगला (निताळे - वावंजे) आदिवासी वाडी आहे. वाडीत ४५-५० घरे आहेत. येथील आदिवासी मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. गावात २००१ मध्ये मुलांसाठी वस्ती शाळा सुरू झाली. यावेळी १४-१५ मुले शाळेत येत होती. शाळा कधी मंदिरात, तर कधी झाडाखाली भरत होती. शिक्षिका रेखा पाटील स्वत: घरोघरी जाऊन मुलांना शाळेत घेऊन यायच्या. आदिवासी मुलांना शाळेची आवड लावण्याचे काम त्यांनी केले. आज शाळेत पहिली ते सातवीचे वर्ग असून ४३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दोन महिन्यापूर्वी संजय कदम यांची येथे मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली. आदिवासी मुलांना संगणकीय शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी ई-लर्निंगसाठी प्रयत्न सुरू केले. त्याच्या पाठपुराव्यामुळे एक कंपनी शाळेला संगणक व प्रोजेक्टर द्यायला तयारही झाली. मात्र शाळेतच काय आदिवासी वाडीतही अद्याप वीज न पोहोचल्याने मुलांना स्मार्ट शिक्षण कसे द्यावे, असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. (वार्ताहर) खानाचा बंगला आदिवासी वाडीसाठी वीज पुरवठा योजना मंजूर झाली होती. मात्र अनुदान न मिळाल्याने योजना पूर्ण होऊ शकली नाही. आता दीनदयाळ उपाध्याय योजनेस मंजुरी मिळाली आहे. एजन्सीची नेमणूक झाल्यावर दोन महिन्यात या वाडीवर वीज पुरवठा होईल.-डी.बी. गोसावी, कार्यकारी अभियंता, वीज मंडळ आदिवासी मुलांना माहिती-तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे, त्यांच्यात डिजिटल शिक्षणाबाबत आवड निर्माण व्हावी, यासाठी परिसरातील कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संगणक, प्रोजेक्टर देण्याची तयारी दर्शवली. मात्र आदिवासीवाडीत अद्याप वीजच न आल्याने डिजिटल शिक्षण हे केवळ दिवास्वप्न राहिले आहे.- संजय निकम, मुख्याध्यापकखानाचा बंगला आदिवासीवाडीचा १९८४ पर्यंत ग्रामपंचायतीत समावेश नव्हता. कालांतराने निताळ ग्रामपंचायतीकडून घरपट्टी वसूल करण्यात येऊ लागली. ३० वर्षे पाठपुरावा केल्यावर २०१५ मध्ये पहिल्यांदा आदिवासी वाडीतील लोकांनी ग्रामपंचायतीसाठी मतदान केले. वीजेसाठी प्रयत्न सुरू आहेत. -जानू कातकरी, सामाजिक कार्यकर्ते