शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

व्हीआयपी नंबरसाठी प्रतिष्ठित व्यक्तींना घातला गंडा?

By admin | Updated: March 11, 2017 02:26 IST

प्रतिष्ठित व्यक्तींना आकर्षक व्हीआयपी मोबाइल नंबर देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या दोघांनी देशभरात अनेकांना गंडवल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवी मुंबई : प्रतिष्ठित व्यक्तींना आकर्षक व्हीआयपी मोबाइल नंबर देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या दोघांनी देशभरात अनेकांना गंडवल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ४० ते ५० लाख रुपये किमतीचे मोबाइल नंबर स्वस्तात देण्याच्या बहाण्याने त्यांनी अनेकांची आर्थिक फसवणूक केली आहे. अशाच एका प्रकरणातून एपीएमसी पोलिसांनी उच्चशिक्षित दोघा तरुणांना अटक केली आहे.एअरटेल कंपनीचे कामगार असल्याचे भासवून आकर्षक व्हीआयपी मोबाइल नंबर देण्याच्या बहाण्याने अनेकांना फसवले जात आहे. तुर्भेतील सचिन पाटील यांनाही अशाच प्रकारे अज्ञात दोघांनी साडेचार लाख रुपयांना गंडवले होते. व्हीआयपी मोबाइल नंबर मिळवून देतो. त्या दोघांनी स्वत:चे एअरटेल कंपनीचे ओळखपत्र दाखवून पाटील यांचा विश्वास संपादित केला होता. यानंतर फोनवर संभाषण करून अथवा व्हॉट्स अ‍ॅपद्वारे ते पाटील यांच्या संपर्कात होते. त्यांनी कंपनी दरानुसार सुमारे चाळीस लाख रु पये किमतीचा व्हीआयपी नंबर स्वस्तात देतो, असे सांगितल्यानंतर पाटील यांनी त्यांना टप्प्याटप्प्यांनी साडेचार लाख रु पये दिले होते. ही रक्कम त्यांच्या सांगण्यानुसार एका बँक खात्यात जमा करण्यात आली होती. तर काही रक्कम अंगडीया मार्फत नमूद ठिकाणी पोहोचवण्यात आली होती. मात्र, काही दिवसांनी त्यांच्यासोबतचा संपर्क तुटल्यामुळे पाटील यांनी एअरटेल कंपनीत चौकशी केली असता फासवणूक झाल्याचे त्यांना कळले. याप्रकरणी त्यांनी एपीएमसी पोलिसांकडे तक्रार करताच, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राहुल राख यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली होती. या पथकाने कोणताही सुगावा नसताना केवळ तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अवघ्या दहा दिवसांत दोघांना अटक केली आहे. विशाल गोस्वामी व अभिषेक उपाध्याय अशी त्यांची मूळ नावे असून, ते मीरारोडचे राहणारे आहेत.विशालने कॉलसेंटरमधील नोकरी सुटल्यानंतर बालमित्र अभिषेक सोबत मिळून हा कट रचला होता. याकरिता त्यांनी दुसऱ्यांच्या नावे खरेदी केलेले बनावट मोबाइल सीम कार्ड वापरले होते. संजय प्रजापती व नरेंद्र कुशवाह अशी ते स्वत:ची नावे सांगायचे. तर पोलीस आपल्याला पकडूच शकणार नाहीत, असाही त्यांचा ठाम विश्वास होता. यानुसार व्हीआयपी नंबर खरेदीसाठी लाखो रुपये खर्चू शकतील, अशा प्रतिष्ठित व्यक्तींना फोनवरून संपर्क साधायचे, ही रक्कम ते अनोळखी व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये जमा करायला सांगायचे, काही कालावधीनंतर ती रक्कम दुसऱ्याच्या खात्यातून कशी काढायची याचाही कट त्यांनी रचलेला होता. त्यापूर्वीच एपीएमसी पोलिसांनी दोघांनाही अटक केली. (प्रतिनिधी)