शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये विकासाच्या नावाखाली घेतला जातोय झाडांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 02:01 IST

नवी मुंबईनंतर आता पनवेल परिसरामध्येही दुकानांच्या समोरील वृक्षांवर विषप्रयोग करण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत.

- अरुणकुमार मेहेत्रेकळंबोली - नवी मुंबईनंतर आता पनवेल परिसरामध्येही दुकानांच्या समोरील वृक्षांवर विषप्रयोग करण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. नेरे-माथेरान रोडवरील अनेक झाडे विषप्रयोगाने मारली गेली आहेत. त्याचबरोबर कळंबोलीत सुद्धा हा प्रकार समोर आला आहे. शासनाकडून वृक्ष लागवडीसाठी करोडो रु पये खर्च करत असले तरी पनवेल परिसरात झाडे अशा प्रकारे मारली जात आहेत. याबाबत महापालिका व सिडकोकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.नवीन पनवेल येथील एचडीएफसी ते आदई सर्कल या दरम्यान सिडकोने सुरु वातीला झाडे लावून वनराई केली. या रोडवर बँका, शोरु म, बांधकाम व्यावसायीकांची कार्यालये असल्याने वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे नागरिक व वाहनांची सातत्याने वर्दळ असते. उन्हाळ्यात हीच झाडे सावली देण्याचे काम करत असत. अचानक येथील झाडे सुकू लागली. झाडांची पानगळ झाली. अशी शेकडो झाडे मरणावस्थेत आहेत. या झाडांवर विषप्रयोग होत असल्याने ती मृत अवस्थेत आहेत. सद्यस्थितीत मोठमोठी दुकाने, शोरु म, जाहिरात फलक दिसत नाहीत म्हणून हिरवळ असलेल्या झाडांची विष देवून कत्तल केली जाते. कळंबोलीतील होर्डिंग उभारण्यासाठी झाडांना विष देवून मारण्यात आले.याबाबत पनवेल परिसरातील सामाजिक संस्थांनी आवाज उठवत चौकशीची मागणी केली. याबाबत पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत आवाज उठवला. मात्र रविवारी होर्डिंगवर जाहिरातीचा फलक लावण्यात आला. यामुळे सभागृह नेते, स्थायी समितीचे माजी सभापती व भाजपचे कळंबोली शहरउपाध्यक्ष तोंडघशी पडले. मनसेनेसुद्धा निवेदन दिले, सह्यांची मोहीम घेतली. मात्र जाहिरातीचा फलक उभा राहिला आहे.पर्यावरणाच्या संतुलनावरही परिणामविकासासाठी होणाऱ्या वृक्षतोडीचा परिणाम पर्यावरणावरही होऊ लागला आहे. अशीच स्थिती राहिली तर नवी मुंबई, पनवेल परिसरातील प्रदूषण वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महामार्ग रुंदीकरण, उड्डाणपूल, रस्ते सिमेंटीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. यासाठीही मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यात आली आहेत.या बदल्यात तिप्पट झाडे लावणे बंधनकारक असताना, अद्याप एकही झाड लावण्यात आले नाही. या संदर्भात वनविभाग अधिकारी ज्ञानेश्वर सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता हे आमच्या अखत्यारीत येत नाही. महापालिका व सिडकोनेच दक्षता घ्यावी असे त्यांनी सांगितले. महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त तेजस्विनी गलांडे यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिक्रिया मिळाली नाही.झाडांवर असा विषप्रयोग केला जातोझाडांची साल काढली जाते. तसेच काही झाडांच्या खोडावर खिळे ठोकून दोन तीन इंच छिद्रे करण्यात येते. त्यात इंजेक्शनद्वारे मारक रसायन आत सोडले जाते. यात सल्फ्युरीक व हायड्रोक्लोरीक अ‍ॅसिडचाही वापर केला जातो. त्यामुळे हळूहळू झाडे मृत अवस्थेत जातात. झाडांची पानगळ होते.महापालिका व सिडकोची अनास्थाइतक्या मोठ्या प्रमाणात रसायनाचा वापर करून झाडे मारली जातात. पण याच्या मुळाशी जावून सिडको आणि महापालिका शोध घेत नाही. संबंधितांवर गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे. यासाठी कोणी पुढे येत नसल्याची खंत अ‍ॅड. श्रीनिवास क्षीरसागर यांनी व्यक्त केली.नवी मुंबईमध्येही घडल्या होत्या घटनायापूर्वी नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्येही हा विषय चर्चेत आला होता. वाशी सेक्टर १७, वाशी रेल्वे स्टेशनसमोरील व्यावसायिक इमारतींचा परिसर, सानपाडामधील एक शाळा व इतर दुकानांच्या समोरील वृक्ष अचानक सुकले होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई