शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

भाज्यांनी गाठली शंभरी, गवार, वाटाणा १६० रुपयांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 06:51 IST

बाजार समितीमध्ये सोमवारी ६५१ वाहनांमधून २६ हजार टन भाजीपाल्याची आवक झाली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली असली तरी बाजारभाव गगनाला भिडू लागले आहेत. जवळपास सर्वच भाज्यांनी शंभरी ओलांडली आहे. वाटाणा १४० ते १६० रुपये किलो व गवार १०० ते १६० रुपये किलो दराने विकली जात असून एक जुडी पालेभाजीसाठी २५ रुपये मोजावे लागत आहेत. 

बाजार समितीमध्ये सोमवारी ६५१ वाहनांमधून २६ हजार टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. यामध्ये ४ लाख ६४ हजार जुडी पालेभाज्यांचाही समावेश आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशी साधारणत: तीन हजार टन कृषिमालाची व ५ ते ७ लाख जुडी पालेभाज्यांची विक्री होत असते. आवक कमी झाली असल्यामुळे भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. भेंडी, गवार, घेवडा, ढोबळी मिरची, राजमा, तोंडली, दुधी  या भाज्यांचे दर प्रतिकिलो शंभरपेक्षा जास्त झाले आहेत. कोथिंबिरीसह पालेभाज्यांचेही दर वाढले आहेत. सर्वच भाज्यांचे दर वाढत असताना टोमॅटोने मात्र ग्राहकांना दिलासा दिला आहे. होलसेल मार्केटमध्ये टोमॅटो १६ ते २२ रुपये किलो दराने विकला जात असून किरकोळ मार्केटमध्ये टोमॅटो ३० ते ४० रुपये किलो दराने विकला जात आहे. 

पावसामुळे उत्पादनावर परिणाम झाला असल्यामुळे बाजार समितीमध्ये आवक कमी होत आहे. आवक कमी असल्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत.  इतर भाज्यांचे दर वाढत असताना टोमॅटोचे दर नियंत्रणात आहेत.     - स्वप्निल घाग, भाजीपाला विक्रेते

भाजीपाल्याचे दरभाजीपाला    १८ जुलै    २५ जुलैबीट    १६-२४    २४-२८  भेंडी    ३०-४५    ३०-७५फरसबी    ५५-७५    ६०-९०गवार    ५०-८०    ६० ते ९०घेवडा    ४५-७५    ५०-७५ढोबळी मिरची    ३०-४४    ३५-६०दोडका    ३५-५०    ४०-७०वाटाणा    ८०-१००    ९०-११० तोंडली    ३०-८०    ३०-१००दुधी भोपळा    ३० ते ५०    ३० ते ६०

टॅग्स :vegetableभाज्याNavi Mumbaiनवी मुंबई