शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याची आवक वाढली; टोमॅटो, मिर्चीसह कोथिंबीरचे दर निम्यावर

By नामदेव मोरे | Updated: August 17, 2023 19:50 IST

एक दिवसात ८ लाख जुडी पालेभाज्यांची आवक

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे बाजारभाव घसरू लागले आहेत. पंधरा दिवसामध्ये टोमॅटो, मिर्ची, कोथिंबीरचे दर निम्यावर आले आहेत. पालेभाज्याही स्वस्त झाल्या असून यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला असून भाव मिळेनासा झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे.

बाजार समितीमध्ये गुरूवारी राज्याच्या विविध भागातून ६८९ वाहनांमधून २६८२ टन भाजीपाल्याची आवक झाली होती. यामध्ये ८ लाख २९ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. एकाच दिवशी २ लाख ७३ हजार जुडी कोथिंबीर व दोन लाख पेक्षा जास्त जुडी मेथीसह पालकची आवक झाली आहे. ऑगस्टच्या सुरूवातीला १० ते १६ रुपये दराने विकली जाणाऱ्या कोथंबिरचे दर ५ ते ८ रुपये झाले आहेत. मेथी १० ते १५ वरून ६ ते ८, पालक ६ ते १० रुपयांवरून ५ ते ७ रुपये झाले आहेत. टोमॅटोच्या दरामध्येही मोठी घसरण झाली आहे. दोन आवठड्यात बाजारभाव ८० ते १०० वरून ४० ते ६० वर आले आहेत.हिरवी मिर्ची, बटाटा, भेंडी, फरसबी, फ्लॉवर, काकडी, कारली, ढोबळी मिर्ची, शेवगा शेंग यांच्या दरामध्येही घसरण झाली आहे.भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आवक वाढल्याने दर कमी होऊ लागले आहेत. पुढील काही दिवस आवक चांगली राहण्याची शक्यता आहे. शंकर पिंगळे, संचालक भाजीपाला मार्केट

बाजार समितीमधील भाजीपाल्याचे दर पुढील प्रमाणे

  • वस्तू - १ ऑगस्ट - १७ ऑगस्ट टाेमॅटो - ८० ते १०० - ४० ते ६०
  • मिर्ची - ४५ ते ६० - २८ ते ३२
  • बटाटा ११ ते १७ - ९ ते १४
  • भेंडी ३० ते ४४ - ३० ते ३८
  • फरसबी - ६५ ते ७२ - ५० ते ६०
  • फ्लॉवर - १५ ते २२ - १४ ते २०
  • काकडी - २० ते ३२ - १५ ते २५
  • कारली - ३८ ते ४५ - ३५ ते ४०
  • ढोबळी मिर्ची - ६५ ते ७५ - ४० ते ६०
  • शेवगा शेंग - ४० ते ४५ - ३५ ते ४०
  • भालेभाज्या प्रतीजुडी
  • वस्तू - १ ऑगस्ट - १७ ऑगस्ट
  • कोथिंबीर - १० ते १६ - ५ ते ८
  • मेथी १० ते १५ - ६ ते ८
  • पालक - ६ ते १० - ५ ते ७
  • शेपू १० ते १४ - ६ ते ८
टॅग्स :vegetableभाज्याNavi Mumbaiनवी मुंबई