लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : खांदा वसाहतीचा समावेश असलेल्या प्रभाग १५ मध्ये भाजपा उमदेवारांनी प्रचारार्थ वासुदेवाची स्वारी आणली आहे. एका हातात चिपळी आणि दुसऱ्या हातात परिचयपत्र आणि मुखात भाजपा उमेदवारांचा जप करीत वासुदेव रहिवाशांना कमळाच्या चिन्हाची आठवण करून देत आहे. प्रचाराकरिता ही अनोखी शक्कल भाजपा उमेदवारांनी लढवली आहे.मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व प्रभागांमध्ये उमेदवारांकडून वेगवेगळ्या युक्त्या लढवत आहेत. प्रचार फेऱ्या, पदयात्रा सुरू आहेतच त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमाचाही प्रचारासाठी उपयोग करू लागले आहेत. परंतु प्रभाग १५ मध्ये भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी तसेच मतदारांचे लक्ष आकर्षित करून घेण्याकरिता भाजपाचे स्थानिक पदाधिकारी सदानंद पाटील यांनी थेट वासुदेवालाच प्रचारात उतरवले आहे. गेल्या तीन दिवसांपासून गोविंद भिका खैरनार हा तरु ण वासुदेवाची वेशभूषा करून भाजपाचा प्रचार करत आहे. हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलेला गोविंद हा उत्तम कलाकार आहे. वारकरी, गोंधळी, त्याचबरोबर वासुदेवाचा अभिनय तो अतिशय उत्तमरीत्या करतो. सकाळी साडेसहा ते दहा वाजेपर्यंत हा वासुदेव घरोघरी भेट देऊन प्रभागातील उमेदवारांचा प्रचार करीत आहे.
प्रचारात वासुदेवही सहभागी
By admin | Updated: May 13, 2017 01:25 IST