शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वाशी भाजीपाला मार्केटला छत्रपती संभाजीराजांचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2018 20:45 IST

शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळवून देणे अत्यंत गरजेचे आहे.

नवी मुंबई: वाशी येथील भाजीपाला बाजार संकुलाला  'धर्मवीर संभाजीराजे भाजीपाला बाजार संकुल' नाव देण्याचा नामकरण सोहळा सोमवारी पार पडला. या कार्यक्रमाला राज्याचे पणनमंत्री सुभाष देशमुख, पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. यावेळी सदाभाऊ खोत यांनी म्हटले की, धर्मवीर संभाजी राजेंच्या जन्मदिनी भाजीपाला मार्केटचे नाव धर्मवीर संभाजीराजे भाजीपाला बाजार संकुल असे करण्याचा निर्णय तब्बल 20 वर्षांनंतर आमच्या सरकारने  घेऊन धर्मवीर संभाजी राजेंना मानाचा मुजरा केला असे म्हणने वावगे ठरणार नाही.  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा आत्मा असून आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती आहे. या बाजार समितीमध्ये आपण सर्वांनी विशेष लक्ष देऊन शेतमाल निर्यातीला चालना देण्याची गरज आहे. तसेच, शेतकऱ्यांच्या येणाऱ्या शेतमालाची साठवणूक करण्यासाठी गोदाम व शीतगृहाची सुविधा बाजार समितीने उपलब्ध करून द्यावे. तसेच शेतकऱ्यांचा शेतमाल जगाच्या बाजारपेठेत पाठविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बाजार समितीला बजवावी लागणार आहे. स्पर्धात्मक युगात शेतकरी टिकणे अतिशय महत्त्वाचे असून त्याकरीता बाजार समित्यांची भूमिका दिशादर्शक ठरणार आहे. शेतकरी शेतात काबाडकष्ट करतो आणि त्याच्यावरच हजारो लोकांची पोटं चालतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळवून देणे अत्यंत गरजेचे आहे. गेली कित्येक वर्षे या भाजीपाला बाजार संकुलाचा नामकरण सोहळा मागच्या सरकारने प्रलंबित ठेवला होता. परंतु, या सरकारने त्यावर तात्काळ सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे या बाजार संकुलाला धर्मवीर सभाजीराजे भाजीपाला बाजार संकुल  हे नाव देण्यात आल्याचे खोत यांनी सांगितले. 

टॅग्स :vegetableभाज्याNavi Mumbaiनवी मुंबई