शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंच्या अडचणीत वाढ, ६ फेब्रुवारीला वाशी कोर्टात हजर राहण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 16:08 IST

२०१४ साली मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाका फोडला होता. या प्रकरणात आता खुद्द राज ठाकरेंनाही कोर्टात हजर राहावं लागणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना ६ फेब्रुवारी रोजी वाशी कोर्टात हजर रहावे लागणार आहे. त्यासंदर्भातील आदेश कोर्टाने जारी केले आहेत. २०१४ साली मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाशी टोल नाका फोडला होता. या प्रकरणात आता खुद्द राज ठाकरेंनाही कोर्टात हजर राहावं लागणार आहे. 

वाशी टोलनाका तोडफोडप्रकरणी २०१८ आणि २०२० मध्येही राज ठाकरे यांना समन्स बजावण्यात आले होते. आता या प्रकरणाच्या सुनावणीत न्यायाधीशांनी राज ठाकरे यांनी कोर्टात हजर राहणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे ६ फेब्रुवारी रोजी राज ठाकरे कोर्टात हजर राहणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

नेमकं प्रकरण काय?२६ जानेवारी २०१४ साली राज ठाकरे यांनी वाशी येथे पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात टोलनाक्यांवरून सरकारवर जोरदार टीका केली होती. तसेच कार्यकर्त्यांना टोलनाके बंद पाडण्यासाठी चिथावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. मनसेच्या या मेळाव्यानंतर नवी मुंबईचे मनसेचे नेते गजानन काळे यांनी काही कार्यकर्त्यांसह वाशी टोल नाक्यावर तोडफोड केली होती. यात टोलनाक्याचं प्रचंड नुकसान झालं होतं. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात ३० जानेवारी २०१४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेtollplazaटोलनाकाNavi Mumbaiनवी मुंबई