शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

कंत्राटी कामगारांवर लक्ष ठेवण्यासाठी तंत्राचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 01:38 IST

महानगरपालिकेच्या ५७०० कंत्राटी कामगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिओ फेंसिंग व ट्रॅकिंग प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

नवी मुंबई : महानगरपालिकेच्या ५७०० कंत्राटी कामगारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिओ फेंसिंग व ट्रॅकिंग प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ११ कोटी ५१ लाख रूपये खर्चाच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने मंजुरी दिली असून कामगारांच्या मनगटावर आधुनिक यंत्र बांधण्यात येणार आहे.पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन, उद्यान, शिक्षण, क्रीडा, विष्णुदास भावे, मालमत्ता विभाग, कार्यकारी अभियंता मोरबे, पाणीपुरवठा, मलनि:सारण, विद्युत विभागामध्ये ५७०० कंत्राटी कामगार काम करत आहेत. कामगार नेमून दिलेल्या ठिकाणी ८ तास काम करत आहेत का,कामावर वेळेत येत आहेत का याविषयी लक्ष ठेवण्यासाठी पालिकेने यापूर्वी अनेक उपाययोजना राबविल्या आहेत. कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली आहे. परंतु यानंतरही बोगस कामगार व कामचुकार कामगारांवर नियंत्रण ठेवणे शक्य झालेले नाही. यामुळे जिओ फेसिंग व ट्रॅकिंग प्रणालीचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी नागपूरमध्ये या तंत्राचा वापर करण्यात आला आहे.कामगारांच्या मनगटावर हे अत्याधुनिक घड्याळ बसविण्यात येणार आहे. यामुळे कामगार किती वाजता कामावर आला, निर्धारित वेळेत काम केले का नाही हे समजणार आहे. यासाठी ११ कोटी ५१ लाख रूपये खर्च होणार आहेत.सर्वसाधारण सभेने या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. प्रस्तावावर चर्चा करताना नगरसेवकांनी विविध प्रश्न उपस्थित केले. बायोमेट्रिक हजेरीचे काय झाले. कामगारांसाठी उपलब्ध करून दिलेल्या हजेरी शेडचा वापर केला जातो की नाही .फक्त कंत्राटी कामगारांवरच नियंत्रण कशासाठी असे प्रश्नही नगरसेवकांनी उपस्थित केले. कामगारांवर अविश्वास दाखविण्यात येत असल्याचेही यावेळी निदर्शनास आले. चर्चेनंतर सर्वमताने हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.तंत्राविषयी माहितीकंत्राटी कामगाराला नेमून दिलेल्या प्रत्येक बीट जिओफेसिंग करणारबीटमध्ये काम करणाºया कंत्राटी कामगाराच्या मनगटावर घड्याळासारखे यंत्र बसविण्यात येणारमनगटावरील यंत्र जीपीआरएस व जीपीएस दोन्ही प्रणालीवर काम करणारकामगार किती वेळ कामावर होता हे स्पष्ट होणारकंत्राटी कामगारांचे वेतन अद्ययावत प्रणालीप्रमाणे काढण्यात येणारकामगारांनी त्यांच्या जागेवर दुसरा लावल्यास नियंत्रण कक्षातील कॅमेºयात स्पष्ट दिसणारयंत्र खराब करण्याचा प्रयत्न केल्यास नियंत्रण कक्षाला अ‍ॅलर्ट मिळणारकामगाराची तब्येत बिघडल्यास नियंत्रण कक्षाला नाडीचे ठोके समजणार

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका