न्हावा-शिवडी सागरी सेतूवर उरणकरांना टोलमाफी मिळावी: कामगार नेते महेंद्र घरत यांची मागणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 07:02 PM2024-01-01T19:02:03+5:302024-01-01T19:03:04+5:30

मधुकर ठाकूर  उरण : न्हावा - शिवडी हा जवळ जवळ २२ किलोमीटरचा एमएमआरडीएचा महत्वाकांक्षी सागरी महामार्ग प्रकल्प पूर्णत्वास येत ...

Urankar should get toll exemption on Nhava-Shivdi Sea Bridge: Labor leader Mahendra Gharat's demand! | न्हावा-शिवडी सागरी सेतूवर उरणकरांना टोलमाफी मिळावी: कामगार नेते महेंद्र घरत यांची मागणी!

न्हावा-शिवडी सागरी सेतूवर उरणकरांना टोलमाफी मिळावी: कामगार नेते महेंद्र घरत यांची मागणी!

मधुकर ठाकूर 

उरण: न्हावा - शिवडी हा जवळ जवळ २२ किलोमीटरचा एमएमआरडीएचा महत्वाकांक्षी सागरी महामार्ग प्रकल्प पूर्णत्वास येत आहे. या प्रकल्पासाठी उरण तालुक्यातील स्थानिकांच्या जमिनी संपादीत करण्यात आल्या असून हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी स्थानिकांचा मोलाचा हातभार लागला आहे. या सागरी सेतूमुळे नवी मुंबई व उरण वासियांना मुंबईला २० मिनिटांत पोहोचता येणार असून जवळ जवळ ४० मिनिटांचा वेळ वाचणार आहे.

एमएमआरडीएचा व सिडकोचे सर्व प्रकल्प स्थानिकांच्या जमिनीवर उभारले गेले आहेत. या सागरी सेतूवर टोलनाका असणार आहे. तरी या टोलनाक्यावर न्हावा, न्हावा खाडी,गव्हाण, शिवाजीनगर, गव्हाण कोपर, मोरावे, वहाळ, बामनडोंगरी, जासई, शेलघर, जावळे, चिर्ले, गावठाण सहित संपूर्ण उरण तालुक्यातील स्थानिकांना टोलमाफी देण्यात यावी अशी मागणी कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व एमएमआरडीएकडे केलेली आहे. स्थानिकांना टोलमाफी मिळाली तर सागरी सेतूवरून प्रवास करतांना ग्रामस्थांना दिलासा मिळेल अशी भावना महेंद्र घरत यांनी व्यक्त केली.

Web Title: Urankar should get toll exemption on Nhava-Shivdi Sea Bridge: Labor leader Mahendra Gharat's demand!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.